ETV Bharat / state

परभणी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत गंगाखेडने मारली बाजी

या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना खुपच रोमहर्षक ठरला. आनंदवन क्रीडा मंडळ, गंगाखेड व राजे शिवाजी क्रीडा मंडळ, कोल्हा यांच्यात अंतिम सामना झाला.

एका गुणसंख्येने आघाडी घेऊन गंगाखेड संघाने कोल्हा संघावर विजय मिळवला
author img

By

Published : Mar 19, 2019, 9:02 AM IST

परभणी - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ५० किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणसंख्येने आघाडी घेऊन गंगाखेड संघाने कोल्हा संघावर विजय मिळवला. ही स्पर्धा पाथरी येथे कबड्डी महर्षी स्व. बुवासाहेब साळवी क्रिडा मैदानावर उशिरापर्यंत रंगली होती.

एका गुणसंख्येने आघाडी घेऊन गंगाखेड संघाने कोल्हा संघावर विजय मिळवला

या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम सामना खुपच रोमहर्षक ठरला. आनंदवन क्रीडा मंडळ, गंगाखेड व राजे शिवाजी क्रीडा मंडळ, कोल्हा यांच्यात अंतिम सामना झाला. शेवटच्या एका मिनिटात गंगाखेड-१२ आणि कोल्हा-१३ अशी गुणसंख्या असताना गंगाखेड संघाच्या अभय मादाळे याने आक्रमक चढाई करून आपल्या संघाला एक गुण मिळवुन सामना बरोबरीत आणला. नियमानुसार पाच-पाच चढायामध्ये आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेडच्या संघाने राजे शिवाजी कोल्हा संघावर एका गुणांची मात करून अजिंक्यपद पटकावले.

दरम्यान, ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा युवा कार्यक्रम व केंद्रीय मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र परभणीच्या वतीने पाथरी येथील साई क्रिडा मंडळ व व्यायाम शाळेच्यावतीने घेण्यात आली. पुरस्कार वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ज्ञ डॉ. जगदिश शिंदे हे उपस्थित होते, तर स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्या हस्ते झाले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदिप तिडके, किरण घुंबरे पाटील, बाबासाहेब गर्जे, माणिकराव केंद्रे, शैलेश शामकुवर, धनंजय आडसकर, नवनाथ देशमुख, अतिष गरड, भारत धनले, नितिन जाधव, चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती. जिल्ह्यातील विविध मंडळांचे ५० किलो गटातील विविध संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

'हे' खेळाडू ठरले विशेष मानकरी

स्पर्धेत उत्कृष्ट चढाई खेळाडू म्हणून गंगाखेडच्या अभय मादाळेचा गौरव करण्यात आला. तर सर्वोत्कृष्ट पकड गणेश बोबडे व राजे शिवाजी कोल्ह्याचा तुफानी रायडर विठ्ठल देशमुख हा मॅन ऑफ दि मॅचचा मानकरी ठरला.

स्पर्धेचा निकाल -

प्रथम पारितोषिक - आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड.
द्वितीय - राजे शिवाजी क्रीडा मंडळ कोल्हा.
तृतीय- मानवत स्पोर्ट अकादमी.
तृतीय- मानवत स्पोर्टस् अकादमी.

Intro:परभणी - अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या ५० किलो वजनी गटातील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केवळ एका गुणसंख्येने आघाडी घेऊन गंगाखेड संघाने कोल्हा संघावर विजय मिळवला. ही स्पर्धा पाथरी येथे कब्बडी महर्षी स्व. बुवासाहेब साळवी क्रिडा मैदानावर उशिरापर्यंत रंगली होती. स्पर्धा पाहण्यासाठी श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. Body:या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग नोंदवल होता. अंतिम सामना खुपच रोमहर्षक ठरला. अंतिम सामन्यात आनंदवन क्रीडा मंडळ, गंगाखेड व राजे शिवाजी क्रीडा मंडळ कोल्हा यांच्यात झाला. हा सामना शेवटपर्यंत कोणाच्या पारड्यात पडेल, याची वेळोवेळी उत्कंठा दाटून येत होती. शेवटच्या एका मीनिटात गंगाखेड - १२ आणि कोल्हा - १३ अशी गुणसंख्या असतांना गंगाखेड संघाच्या अभय मादाळे याने आक्रमक चढाई करून आपल्या संघाला एक मिळवुन सामना बरोबरीत आणला. नियमानुसार पाच-पाच चढायामध्ये आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेडच्या संघाने राजे शिवाजी कोल्हा संघावर एका गुणांची मात करून अजिंक्यपद पटकावले. दरम्यान, ही जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धा युवा कार्यक्रम व केेंद्रीय मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र परभणीच्या वतीने पाथरी येथील साई क्रिडा मंडळ व व्यायम शाळेच्यावतीने घेण्यात आली. दरम्यान, पुरस्कार वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ञ डॉ. जगदिश शिंदे हे उपस्थित होते, तर स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य कब्बडी असोशियशनचे कोषाध्यक्ष मंगल पांडे यांच्या हस्ते झाले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदिप तिडके, किरण घुंबरे पाटील, बाबासाहेब गर्जे, माणिकराव केंद्रे, शैलेश शामकुवर, धनंजय आडसकर, नवनाथ देशमुख, अतिष गरड, भारत धनले, नितिन जाधव, चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती.या वेळी मंगल पांडे, डॉ. शिंदे, किरण घुंबरे पाटील, कबड्डीचे प्रशिक्षक भारत धनले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे समन्वयक संदिप तिडके यांनी केले तर सुत्रसंचलन क्रिडा शिक्षक तुकाराम शेळके यांनी केले. जिल्ह्यातील विविध मंडळांचे पन्नास किलो गटातील विविध संघ या स्पर्धेत सहभागी झाले होत.

" 'हे' खेळाडू ठरले विशेष मानकरी "
स्पर्धेत उत्कृष्ट चढाई खेळाडू म्हणून गंगाखेडच्या अभय मादाळेचा गौरव आला. तर सर्वोत्कृष्ट पकड गणेश बोबडे व राजे शिवाजी कोल्ह्याचा तुफानी रायडर विठ्ठल देशमुख हा मॅन ऑफ दि मॅचचा मानकरी ठरला.

"स्पर्धेचा निकाल -
प्रथम पारितोषिक - आनंदवन क्रीडा मंडळ गंगाखेड.
द्वितीय - राजे शिवाजी क्रीडा मंडळ कोल्हा.
तृतीय- मानवत स्पोर्ट अकादमी.
तृतीय- मानवत स्पोर्टस् अकादमी.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत : विनर team फोटो,
- & कबड्डी समनाचे vis.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.