ETV Bharat / state

कोरोना अपडेट; परभणीत आज तब्बल 48 संभाव्य रुग्ण दाखल, प्रशासन सतर्क

परभणी जिल्ह्यात संभाव्य रुग्णांची मात्र दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. खबरदारी घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परभणीच्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Parbhani
जिल्हा रुग्णालय परभणी
author img

By

Published : Apr 15, 2020, 8:26 PM IST

परभणी - कोरोनाच्या संसर्गामुळे देशभर हाहाकार उडाला असला तरी परभणी जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. संभाव्य रुग्णांची मात्र दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे. एरवी दररोज 10 ते 20 च्या आत असणारे संभाव्य रुग्ण बुधवारी तब्बल 48 वर जाऊन पोहोचले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 417 संभाव्य रुग्णांची नोंद झाली आहे. सध्य परिस्थितीत परभणी जिल्ह्यातील 53 रुग्णांच्या स्वॅबचे नमुने औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात प्रलंबित आहेत. या पूर्वीचे सर्व नमुने निगेटिव्ह आल्याने परभणीचा समावेश ग्रीन झोनमध्ये झालेला आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वप्रथम सीमा बंदी करण्यात आल्याने कोरोनाचा प्रभाव रोखण्यात प्रशासनाला यश आले. आत्तापर्यंत परभणी जिल्ह्यात एकही कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. असे असले, तरी खबरदारीच्या सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून केल्या जात आहेत. आरोग्य प्रशासनाकडून जिल्हाभरात आरोग्य तपासण्या सुरू आहेत. शिवाय अनेक नागरिक त्यांना होणाऱ्या त्रासामुळे जिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासण्या करत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात तब्बल 417 संभाव्य रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 363 रुग्णांचे स्वॅबचे नमुने औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. त्यातील 293 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या परिस्थितीत 53 अहवाल प्रलंबित आहेत.

आज एकाच दिवशी 48 नवीन संभाव्य रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी 30 रुग्णांच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याशिवाय एकूण संशयितांपैकी 144 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तर 53 जणांना सध्या परभणीच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना संसर्गजन्य कक्षात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या 220 लोकांनी कालावधी पूर्ण केला आहे. यामध्ये परदेशातून आलेल्या 62 आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या 6 नागरिकांचा समावेश आहे.

दिल्ली येथील केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परभणीच्या जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त रमेश पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांना कोरोनाविषयी भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि कारवाईबाबत सचिवांनी मार्गदर्शन केल्याचे सांगितले. तर आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी जाहीर केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.