ETV Bharat / state

'कोरोना'शी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पोलिसांवर जिंतुरात पुष्पवर्षाव

author img

By

Published : Apr 10, 2020, 10:18 AM IST

लॉकडाऊन काळात दिवसरात्र जनतेच्या रक्षणार्थ कार्यरत असणाऱ्या पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुवारी जिंतूर शहरात तालुका व्यापारी महासंघाकडून पोलिसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिंतूर पोलिसांनी मुख्य बाजारातून पथसंचालन केले असताना त्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले.

flowers on Jintur Police
पोलिसांवर पुष्पवर्षाव

परभणी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन शासनाला मदत करत आहे. लॉकडाऊन काळात दिवसरात्र जनतेच्या रक्षणार्थ कार्यरत असणाऱ्या पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गुरुवारी जिंतूर शहरात तालुका व्यापारी महासंघाकडून पोलिसांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिंतूर पोलिसांनी मुख्य बाजारातून पथसंचालन केले असताना त्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात आले.

पोलिसांवर जिंतूरात पुष्पवर्षाव

जिंतूर शहरात परभणी पोलीस दलातील अतिशीघ्र दल, दंगा विरोधी पथक, पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पथसंचलन पार पडले. शहरातील प्रमुख मार्गावरून हे संचलन करण्यात आले. यावेळी पोलीस दलाचे मनोबल वाढण्यासाठी कापड बाजारपेठे दरम्यान संचलन आले असता, व्यापारी महासंघाने पुष्पवृष्टी केली. यावेळी जिंतूरचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांचे पुष्पहार घालून संजय कोकडवार यांनी स्वागत केले. सर्व पोलिसदलावर पुष्पवर्षावकरून त्यांचे स्वागत करण्यात आले. या उपक्रमात सुनील तोष्णीवाल, प्रदिप कोकडवार, गणेश कुरे, बद्रीनारायन पोरवाल, दिलीप चिद्रवार, भायेकर, भाकरे, बिपीन चिद्रवार, गिरीष वट्टमवार, गजानन कोकडवार, कृष्णा कोकडवार आदी व्यापारी बांधवांनी सहभागी घेतला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.