ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : परभणीत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण - कोरोना इफेक्ट

अल्पसंख्याक विकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे यावेळी इतर कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. शिवाय इतर मान्यवरांना उपस्थित राहण्यास निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे, जिल्ह्यातील मोजकेच वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

परभणीत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

author img

By

Published : May 1, 2020, 10:02 AM IST

परभणी - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी परभणीत महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला. राज्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 वाजता ध्वजारोहण झाले. मात्र, जिल्ह्यातील इतर कुठल्याही शासकीय इमारतीत ध्वजारोहण झाले नाही. तसेच शाळा व महाविद्यालयातदेखील हा कार्यक्रम टाळण्यात आला.

अल्पसंख्याक विकास मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे यावेळी इतर कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नव्हते. नेहमीप्रमाणे पथसंचलनही झाले नाही. शिवाय इतर मान्यवरांना उपस्थित राहण्यास निमंत्रण दिले नव्हते. त्यामुळे, जिल्ह्यातील मोजकेच वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

परभणीत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
परभणीत केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

कोणत्याही व्यक्तीची भेट न घेता पालकमंत्री ध्वजारोहण करून निघून गेले. याप्रसंगी जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, तहसीलदार विद्याचरण कडवकर हे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.