ETV Bharat / state

कृषी संजीवनी महोत्सवाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद ; जुगाडू यंत्रांसह नवीन वाणांना पसंती

परभणीतील कृषी संजीवनी महोत्सवाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन झाले. त्यानंतर 11 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कृषी संजीवनी महोत्सव परभणी
कृषी संजीवनी महोत्सव परभणी
author img

By

Published : Feb 11, 2020, 6:33 AM IST

परभणी - शहरातील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी संजीवनी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात ग्रामीण भागातील उद्योजकांनी निर्माण केलेल्या जुगाडू यंत्रांसह नवीन पिकांच्या वाहनांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे.

परभणीतील कृषी संजीवनी महोत्सवाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद...

हेही वाचा... अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'मराठी भाषा सक्ती' विधेयक; सत्ताधारी-विरोधकांचे होणार एकमत

सदर कृषी संजीवनी महोत्सवाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 फेब्रुवारी रोजी झाले. त्यानंतर 11 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परभणीसह जवळपासच्या जिल्ह्यातून देखील शेतकरी या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. विशेषतः ग्रामीण भागातील उद्योजकांनी आपल्या अनुभवातून काही जुगाडू यंत्र आणि साहित्य प्रदर्शनात मांडले आहे, त्याकडेही शेतकरी आकर्षित होताना दिसत आहेत.

हेही वाचा... हृदयद्रावक! प्रेमसंबंधातून मुलीचा पळून जाऊन विवाह, आई-वडिलांसह भावाने केली आत्महत्या

कल्टीवेटर, रोटावेटर, नांगरटणी, खुरपणी, पेरणी व माल वाहून नेण्यासाठी मोटारसायकलला लावलेले यंत्र व ट्रेलर पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठाने विकसित आणि संशोधित केलेल्या काही नवीन वाणांना देखील शेतकरी पसंती देत आहेत. दरम्यान, या संदर्भात महोत्सवाचे संयोजक आनंद भरोसे यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर निश्चितच परिणाम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांनी देखील प्रदर्शनात पाहण्यास मिळालेल्या नवनवीन गोष्टीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Intro:परभणी - येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या कृषी संजीवनी महोत्सवात ग्रामीण भागातील उद्योजकांनी निर्माण केलेल्या जुगाडू यंत्रांसह नवीन पिकांच्या वाहनांना शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या महोत्सवात शेतकऱ्यांची गर्दी वाढताना दिसते.Body:सदर कृषी संजीवनी महोत्सवाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 7 फेब्रुवारी रोजी उद्घाटन झाले होते. त्यानंतर 11 फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परभणीसह जवळपासच्या जिल्ह्यातून देखील शेतकरी या महोत्सवाला येत आहेत. या ठिकाणी लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो. विशेषतः या ठिकाणी ग्रामीण भागातील उद्योजकांनी आपल्या अनुभवातून काही जुगाडू यंत्र आणि साहित्य प्रदर्शनात मांडले आहे. कल्टीवेटर, रोटावेटर, नांगरटणी, खुरपणी, पेरणी व माल वाहून नेण्यासाठी मोटारसायकलला लावलेले यंत्र व ट्रेलर पाहण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठाने विकसित आणि संशोधित केलेल्या काही नवीन वाणांना देखील शेतकरी पसंती देत आहेत. दरम्यान, या संदर्भात महोत्सवाचे संयोजक आनंद भरोसे यांनी समाधान व्यक्त केले आहे. हा महोत्सव शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर निश्चितच परिणाम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर शेतकऱ्यांनी देखील प्रदर्शनात पाहण्यास मिळालेल्या नवनवीन गोष्टीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_krushi_mahotasv_pkg (Ready to use)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.