ETV Bharat / state

रत्नाकर गुट्टेंच्या मालमत्तेवर ईडीचे छापे; कोट्यवधीची केली होती फसवणूक

शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरपोखाली ईडीने रत्नाकर गुट्टे    त्यांच्याशी संबधीत गंगाखेड कारखाना, सुनील हायटेक इंजिनिअर्स. लि सह दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर ईडी ने गुरुवारी धाडी टाकल्या. यात कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई गुट्टे यांच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे प्रतिष्ठान, निवासस्थान व बांद्रा वेस्टसह मुंबईत तीन ठिकाणी आणि नागपुरात सिव्हिल लाईन्स व रामदासपेठ येथील निवासस्थानी करण्यात आली.

रत्नाकर गुट्टेंच्या मालमत्तेवर ईडीचे छापे; कोट्यवधीची केली होती फसवणूक
author img

By

Published : Jun 7, 2019, 8:13 PM IST

परभणी - शेतकऱ्यांच्या नावे परस्पर 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून त्यांना फसवणाऱ्या उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या दहा प्रतिष्ठानांवर ईडीने एकाच वेळी धाडी टाकल्या आहेत. परभणीच्या कारागृहात 26 मार्च पासून मुक्कामी असलेल्या गुट्टे यांच्यावर इडीने कारवाईचा चांगलाच फास आवळा आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे ते 'रासप' चे उमेदवार होते. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर होणाऱ्या या कारवाईमुळे आता राजकीय वादंगही निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

रत्नाकर गुट्टेंच्या मालमत्तेवर ईडीचे छापे; कोट्यवधीची केली होती फसवणूक

शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरपोखाली ईडीने रत्नाकर गुट्टे त्यांच्याशी संबधीत गंगाखेड कारखाना, सुनील हायटेक इंजिनिअर्स. लि सह दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर ईडी ने गुरुवारी धाडी टाकल्या. यात कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई गुट्टे यांच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे प्रतिष्ठान, निवासस्थान व बांद्रा वेस्टसह मुंबईत तीन ठिकाणी आणि नागपुरात सिव्हिल लाईन्स व रामदासपेठ येथील निवासस्थानी करण्यात आली. कारवाई गोवा, मुंबई आणि नागपूर ईडीच्या कार्यालयातील २५ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.

उद्योजक गुट्टे यांचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात गंगाखेड शुगर लिमिटेड नावाने साखर कारखाना आणि एक्स्ट्रा नॅचरल अल्कोहोल ( ईएनए ) प्रकल्प आहे. काही वर्षापूर्वी गुट्टे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याची कागदपत्रे, फोटो आदी केवायसी कागदपत्रे तयार केरुन बँकांकडून ३२८ कोटींचे कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. हा घोटाळा त्यांचे विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी उघडकीस आणला होता. शिवाय या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत आवाज उठवून हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर गुट्टे यांच्याविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ईडीने त्यांना या प्रकरणी 26 मार्चला अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तेव्हा पासून ते कारागृहातच आहेत. मधल्या काळात दोन वेळा त्यांनी प्रकृती अस्वस्था मुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. यावेळी त्यांनी अनेक पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. कदाचित येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काही व्हीव्युरचना आखल्याचे सांगितले जात आहे.

"या बँकांमधून उचलले कर्ज"

दरम्यान, रत्नाकर गुट्टे गंगाखेड शुगर अण्ड एनर्जी प्रा. लि या साखर कारखान्याचे सर्वेसर्वा आहेत. गुट्टे यांनी परभणी जिल्ह्यातील २ हजार २९८ शेतकन्यांच्या नावाने पाच राष्ट्रीयीकृत बँका आणि एक खासगी बँक अशा सहा बँकांमधून ३२८ कोटींचे कर्ज घेतले आहे. या सहा बँकांमध्ये आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे. कारखान्याने परभणीसह उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड आणि अकोला या सहा जिल्ह्यातील ८ ते १० हजार शेतकर्‍यांच्या नावे हे कर्ज उचलल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Intro:Pbn Ratnakar gutte vis & photosBody:Pbn Ratnakar gutte vis & photosConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.