ETV Bharat / state

परभणीतील ढालेगाव-मुदगल बंधारे तुडुंब भरले - Parbhani water news

मागील काही दिवसांपासून जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे अर्धा फूटाने उचलले आहेत. धरणातून गोदावरी नदी पात्रात 18 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवरील ढालेगाव व मुदगल हे दोन उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले.

गोदावरी नदीपात्रामध्ये 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
author img

By

Published : Sep 20, 2019, 7:43 PM IST

परभणी - पैठण येथील नाथसागर शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे अर्धा फूटाने उचलले आहेत. धरणातून 18 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडलेले पाणी गुरुवारी परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाले.

गोदावरी नदीवरील ढालेगाव व मुदगल हे दोन उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले

परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवरील ढालेगाव व मुदगल हे दोन उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले. त्यामुळे या बंधाऱ्यांचे दोन दरवाजे उघडले आहेत. या दोन बंधाऱ्यांतून नदीपात्रामध्ये 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या लाभ क्षेत्रातील लोकांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. ढालेगाव बंधारा व मुदगल बंधारा यांची साठवण क्षमता अनुक्रमे 14 दलघमी व 11 दलघमी आहे.

हेही वाचा - औरंगाबाद महानगर पालिका आयुक्तांवर कारवाई करा - खासदार इम्तियाज जलील

जायकवाडीच्या उर्ध्व पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या पावसाळ्यात दोन वेळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मागील चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाणी विसर्गाने गोदावरी नदीवरील सर्वच उच्च पातळी बंधारे काठोकाठ भरले आहेत.

Intro:परभणी - नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याने पैठण येथील नाथ सागर शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे मागील काही दिवसापासून जायकवाडी धरणांमधून सोळा दरवाजे अर्धा फूट उंचीने उचलत 18 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू आहे. हे सर्व पाणी काल दुपारी परभणी जिल्ह्यामध्ये दाखल झाले. त्यामुळे आज परभणी जिल्ह्याच्या तोंडावरच असणाऱ्या गोदावरी नदीवरील ढालेगाव व मुदगल उच्च पातळी बंधारे तुडुंब भरले आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचे दोन दरवाजे उचलत नदीपात्रामध्ये 17 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोदावरीच्या लाभ क्षेत्रातील लोकांचा भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.Body:पैठणचे नाथसागर अर्थात जायकवाडी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे या पावसाळ्यात दोन वेळा नदीपात्रात धरणाची गेट उचलत पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात मध्ये धरण 92 टक्के भरल्यावर करण्यात आलेल्या पाणी विसर्गामध्ये पैठण ते नांदेडपर्यंत असणारे सर्व उच्च पातळी बंधारे पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्यासाठी 35 ते 40 टक्के भरून घेण्यात आले होते. यानंतर परत जायकवाडीच्या वरील उर्ध्व पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस झाल्याने जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. मागील चार दिवसापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पाणी विसर्गाने आता सर्वच उच्च पातळी बंधारे काठोकाठ भरले असून, परभणी जिल्ह्यातील ढालेगाव बंधारा व मुदगल बंधारा ज्यांची साठवण क्षमता अनुक्रमे 14 दलघमी व 11 दलघमी आहे. हेे दोन्ही तुडुंब भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग पुढे करण्यात आला आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत - vis:- pbn_dam_vis_1 to 3Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.