ETV Bharat / state

सरकारने शेतकऱ्यांच्याही नाईट लाईफची चिंता करावी, फडणवीस यांचे सरकारला आवाहन - सरकारने शेतकऱ्यांच्याही नाईट लाईफची चिंता करावी

कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस परभणीत आले होते. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला आवाहन केले. सरकारने मुंबईच्या नाईट लाईफची चिंता केली आहे. मात्र, तशी चिंता त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाईटलाइफचीही करायला हवी असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis comment on maharashtra govt
फडणवीस यांचे सरकारला आवाहन
author img

By

Published : Feb 7, 2020, 4:52 PM IST

Updated : Feb 7, 2020, 6:16 PM IST

परभणी - महाविकास आघाडीच्या सरकारने मुंबईच्या नाईट लाईफची चिंता केली आहे. मात्र, तशी चिंता त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाईटलाइफचीही करायला हवी. शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे सरकारने दिवसा वीज कशी देता येईल, याचे नियोजन करावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस यांचे सरकारला आवाहन

कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त देवेंद्र फडणवीस परभणीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.अशोक ढवण, माजी आमदार मोहन फड, विजय गव्हाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली. याप्रकरणी न्यायालयातसुद्धा योजना योग्य असल्याचे आम्ही मुद्दे मांडून त्याला न्यायालयातही मंजुरी मिळवली. मात्र, आता हे सरकार योजना बंद पडू पाहत असल्याचे आम्हाला समजले. या योजनेमुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात येणार आहे. पश्चिम महाराष्‍ट्राने अडवलेले पाणीसुद्धा मराठवाड्याला मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

हे सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही

हे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही. हे सरकार त्यांच्याच ओझ्याने पडेल असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

हेही वाचा -महाराष्ट्रातही आता दिल्लीचा मोफत वीज पॅटर्न?

हेही वाचा - नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपी ऋषिकेश देवडीकर पुणे एटीएसच्या ताब्यात

सरकारला सल्ला द्यायला आम्ही तयार
मराठवाड्यातील प्रत्येक धरण, नदी हे या योजनेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. मराठवाड्याला सुजलाम-सुफलाम करण्याच्या दृष्टीने ही योजना आम्ही आणली होती. या योजनेच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारला आमचा काही सल्ला हवा असेल, तर आम्ही तो द्यायला तयार आहोत. मात्र, हे सरकार हुशार आहे. मला नाही वाटत त्यांना आमच्या सल्ल्याची गरज आहे. तरीसुद्धा सल्ला हवा असेल तर आम्ही देऊ, असे देखील फडणवीस म्हणाले. याशिवाय फडणवीस यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी आणलेल्या विविध योजनांचा पाढा यावेळी वाचला.

Intro:परभणी - महाविकास आघाडीच्या सरकारने मुंबईच्या नाईट लाईफ चिंता केली आहे. मात्र तशी चिंता त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाईटलाइफचीही करायला हवी. शेतकऱ्यांना रात्रभर जागून पिकांना पाणी द्यावे लागते. त्यामुळे सरकारने दिवसा वीज कशी देता येईल याचे नियोजन करावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज परभणीत महाविकास आघाडी सरकारला केले आहे.

Body:परभणीतील कृषी संजीवनी महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्य मार्गदर्शनात हा मुद्दा मांडला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मेघना बोर्डीकर, कुलगुरू डॉ.अशोक ढवण, माजी आमदार मोहन फड, विजय गव्हाणे, भाजपचे संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख, संयोजक आनंद भरोसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, मराठवाड्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आम्ही मराठवाडा वॉटर ग्रीड योजना आणली. याप्रकरणी न्यायालयात सुद्धा योजना योग्य असल्याचे आम्ही मुद्दे मांडून त्याला न्यायालयाचाही मंजुरी मिळवली. मात्र आता हे सरकार योजना बंद पडू पाहत आहे, असे आम्हाला समजले. या योजनेमुळे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्यात येणार आहे. पश्चिम महाराष्‍ट्राने अडवलेले पाणी सुद्धा मराठवाड्याला मिळणार आहे. मराठवाड्यातील प्रत्येक धरण, नदी हे या योजनेच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. मराठवाड्याला सुजलाम-सुफलाम करण्याच्यादृष्टीने ही योजना आम्ही आणली होती. या योजनेच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारला आमच्या काही सल्ला हवा असेल तर आम्ही तो द्यायला तयार आहोत. मात्र हे सरकार हुशार आहे, मला नाही वाटत त्यांना आमच्या सल्ल्याची गरज आहे. तरीसुद्धा सल्ला हवा असेल तर आम्ही देऊ, असे देखील फडणवीस म्हणाले. याशिवाय फडणवीस यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी आणलेल्या विविध योजनांचा पाढा यावेळी वाचला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_krushi_festival_vis
& pbn_fadnvis_stage_byte

Conclusion:
Last Updated : Feb 7, 2020, 6:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.