ETV Bharat / state

पाईपलाईन फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, 200 क्विंटल कापूस अन् 40 पोती तूर गेली वाहून

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी जलाशयातून आलेली मुख्य पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कुंभकर्ण टाकळीजवळ फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

author img

By

Published : Apr 8, 2020, 10:24 PM IST

पाईपलाईन फुटल्याने शेतकऱयांचे नुकसान, 200 क्विंटल कापूस अन् 40 पोती तूर गेली वाहून

परभणी - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी जलाशयातून आलेली मुख्य पाणी पुरवठ्याची पाईपलाईन कुंभकर्ण टाकळीजवळ फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोनशे ते अडीचशे पोते सोयाबीन, 200 क्विंटल कापूस आणि 40 पोती तूर अक्षरशः वाहून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी घडली असून यामुळे संबंधित शेतकरी रस्त्यावर आले आहेत.

शहराला राहटी नदीतून पाणीपुरवठा करणारी योजना कालबाह्य झाल्याने येलदरी धरणातून पाईपच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना पूर्ण करण्यात आली आहे. येलदरीपासून परभणीपर्यंत जवळपास 60 किलोमीटर अंतरावरून भल्यामोठ्या पाईपच्या माध्यमातून परभणीकरांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु, आज बुधवारी दुपारी हीच मुख्य पाईपलाईन परभणीपासून साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभकर्ण टाकळी या गावच्या बसस्थानकापुढेच अचानक फुटली.

या ठिकाणी गावातील सोपान निलकंठराव सामाले यांचे पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. त्यांच्यासह त्यांच्या काही भावांचा शेतमाल याठिकाणी ठेवलेला होता. या शेडमध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे पोते सोयाबीन, दोनशे क्विंटल कापूस आणि 40 पोती तूर देखील ठेवण्यात आल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.

मनपाची मात्र मुख्य पाईपलाईन फुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, त्या प्रवाहात या शेडचे शटर तुटून पाणी आतमध्ये शिरले. त्यानंतर पाण्याच्या प्रवाहात हे सोयाबीन आणि कापूस अक्षरश: वाहून गेले आहेत. पाईपलाईन नेमकी कशामुळे फुटली, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, घटनेची माहिती कळताच मनपाच्या अधिकार्‍यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन वॉल बंद केला.

अन्यथा हे पाणी शेतांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात पाणी तर वाया गेलेच असते, शिवाय पिकांचेही नुकसान झाले असते. दरम्यान, घटनास्थळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी शेतकऱ्याने प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.