ETV Bharat / state

परभणीच्या संचारबंदीत फक्त दुकाने बंद; रहदारी सुरूच

author img

By

Published : Mar 25, 2021, 12:39 PM IST

जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदीची घोषणा केली. त्यानुसार काल (बुधवारी) संध्याकाळी सात वाजता लागू झालेली ही संचारबंदी १ एप्रिलच्या पहाटे ६ वाजेपर्यंत कायम असणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असली तरी अन्य सर्व दुकाने, प्रतिष्ठाने आणि सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत.

curfew imposed in parbhani, PARBHANI CORONA UPDATE, PARBHANI LETEST NEWS
परभणीच्या संचारबंदीत फक्त दुकाने बंद

परभणी - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परभणी जिल्ह्यात प्रशासनाने आठ दिवसांची संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. मात्र, आज (गुरुवारी) पहिल्या दिवशी परभणी शहरातील सर्व प्रतिष्ठाने आणि दुकाने कडकडीत बंद असली तरी रस्त्यावरची वाहतूक अर्थात रहदारी नेहमीप्रमाणे सुरूच असल्याचे पहावयास मिळाले. दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपुर्ण संचारबंदी करणारे जिल्हा प्रशासन, मनपाचे अधिकारी तसेच पोलीस देखील या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कुठेही रस्त्यावर दिसून आले नाहीत, हे विशेष.

जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने संपूर्ण संचारबंदीची घोषणा केली. त्यानुसार काल (बुधवारी) संध्याकाळी सात वाजता लागू झालेली ही संचारबंदी १ एप्रिलच्या पहाटे ६ वाजेपर्यंत कायम असणार आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असली तरी अन्य सर्व दुकाने, प्रतिष्ठाने आणि सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत. दरम्यान, गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात १ हजाराहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर सुमारे 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती गंभीर बनत असल्याने जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचा निर्णय लागू केला आहे.

परभणीच्या संचारबंदीत फक्त दुकाने बंद..
व्यापारी कामगार कलाकार आणि विविध संघटनांचा विरोध -दरम्यान, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीला जिल्हा व्यापारी महासंघ, जिल्ह्यातील कामगार, कलाकार आणि विविध व्यवसायिक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. काल (बुधवारी) जिल्हाधिकारी कार्यालयापुढे काहीजणांनी आंदोलन देखील केले, तर व्यापारी महासंघाने आक्रमक भूमिका घेत 'प्रत्येक व्यापाराने लॉकडाऊन पाळायचा की नाही, हे स्वतः ठरवावे', असे आवाहन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी संचारबंदीला होणारा विरोध पाहता संचारबंदीचे सुरुवातीचे तीन दिवस परिस्थिती पाहून त्यानंतर अन्य काही बाबींना सवलती देता येतील का? ते पाहता येईल, असे आश्वासन प्रसारमाध्यमांशी बोलताना दिले.दुकाने कडकडीत बंद, वाहतूक मात्र सुरूच -संचारबंदी दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, क्रांती चौक, अष्टभुजा देवी मंदिर, सुभाष रोड, कच्ची बाजार, स्टेशन रोड, विसावा कॉर्नर, वसमत रोड, जिंतूर रोड, गंगाखेड रोड आदी भागातील विविध व्यवसायिकांची दुकाने, प्रतिष्ठाने आणि हॉटेल्स कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. हॉटेल व्यवसायिकांना पार्सल सुविधा देण्याची मुभा देण्यात आली असली तरी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकच नसल्याने हॉटेल व्यावसायिकांनी आपले हॉटेल्स उघडलेली नव्हती. दुसरीकडे रेल्वे सेवा सुरू असल्याने रेल्वे स्टेशन परिसरात मात्र वर्दळ दिसून आली. बस स्थानकात मात्र सर्व बसेस बंद असल्याने शुकशुकाट होता.

दरम्यान, सकाळी नऊ वाजेपर्यंत दूध व्यवसायिकांना घरोघरी फिरून दुध वाटप करण्याची मुभा देण्यात आल्याने रस्त्यावर दूध विक्रेत्यांची वाहने फिरताना दिसून आली. मात्र याशिवाय सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात वाहनांवर फिरताना दिसून आले. अनेक ठिकाणी ऑटोमध्ये बसून जाणारे प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात दिसत होते. विशेषतः स्टेशन रोड, बस स्टँड परिसर, गांधी पार्क, गुजरी बाजार आणि वसमत रोड आदी भागात वाहतूक अर्थात रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याचे पहावयास मिळाले.

संचारबंदीची अंमलबजावणी करणारे अधिकारी पोलीस गायब -

जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू असल्याने प्रत्येक चौकात किंवा ठिकाणी या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा व पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसर वगळता अन्य कुठेही पोलीस किंवा अधिकारी संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी दिसून आले नाहीत. सकाळी दहा वाजेपर्यंत ही परिस्थिती शहरात होती. त्यानंतर सवयी प्रमाणे कार्यालयीन वेळेत अधिकारी आणि कर्मचारी सेवा देण्यासाठी येण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत होती.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.