ETV Bharat / state

परभणीचे खासदार संजय जाधव यांना सुपारी देऊन मारण्याचा कट; तक्रार दाखल - खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट

परभणीचे लोकसभा खासदार संजय जाधव यांना जिवे मारण्यासाठी सुपारी दिल्याची माहिती पुढे येत आहे. यासंबंधी स्वत: जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तसेच सुपारी घेणारी टोळी नांदेडमध्ये असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

MP SANJAY JADHAV
खासदार संजय जाधव
author img

By

Published : Oct 28, 2020, 9:22 AM IST

Updated : Oct 28, 2020, 12:49 PM IST

परभणी - परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार केली आहे. मंगळवारी रात्री उशिरा जाधव यांनी स्वतः नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

दोन कोटी रुपयांची सुपारी-

या संदर्भात खासदार जाधव यांनी 'माझ्या जीवाला धोका असून, आपल्याला सुपारी देऊन जीवे मारण्याचा कट रचण्यात येत असल्याची तक्रार स्वतः परभणी येथील नानलपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दिली. तसेच 'आपल्याला दोन दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

खासदार संजय जाधव

विश्वासू व्यक्तीकडून समजली माहिती-

नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचला आहे, या प्रकरणी एक मोठी टोळी कार्यरत आहे. तसेच आपल्याला जिवे मारण्याची सुपारी देणारा परभणीतील व्यक्ती असावा, असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. त्यामुळे परभणीतील ही बडी व्यक्ती कोण असावी, या बाबत आता तर्कवितर्क लावला जात आहे. विशेष म्हणजे 'ही माहिती आपणास विश्वासू व्यक्तीकडून समजली असल्याचे देखील खासदार जाधव त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.

जाधव यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे हे करीत आहेत.

Last Updated : Oct 28, 2020, 12:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.