ETV Bharat / state

परभणी : विना मास्क फिरणाऱ्यांना पहिल्यांदा 200 व त्यानंतर 500 रुपयांचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोक मास्कचा वापर करत नसल्याने परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड आकारण्याचे लेखी आदेश बजावले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा विना मास्क आढळून येणाऱ्या व्यक्तीला थेट 500 रुपये दंड लावण्याची तरतूद देखील केली आहे.

author img

By

Published : Jun 28, 2020, 6:27 PM IST

people gathered in market of parbhani
परभणीतील बाजारात झालेली गर्दी

परभणी - कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनाने प्रत्येकाला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मात्र, याकडे बहुतांश लोक दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 100 रुपये दंडाची आकारणी होत होती. लोक जुमानत नसल्याने अखेर परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपयांचा दंड आकारण्याचे लेखी आदेश बजावले आहेत. विशेष म्हणजे दुसऱ्यांदा विना मास्क आढळून येणाऱ्या व्यक्तीला थेट 500 रुपये दंड लावण्याची तरतूद देखील जिल्हाधिकार्‍यांनी केली आहे. ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तथा बाजारात फिरताना नागरिक काळजी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

परभणी शहरात गेल्या तीन दिवसांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती; तर आज रविवार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा दिवस म्हणून प्रतिष्ठाने बंद ठेवावीत, असे काल शनिवारी रात्री उशिरा काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार शहरातील दुकाने बंद राहिली.परंतु,भाजीपाला आणि फळांचे हातगाडे आणि रस्त्यावरील विक्रेते मात्र शहरभर दिसून आले. ज्यामुळे नागरिकांनी देखील खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. या गर्दीत मात्र बहुतांश लोक विना मास्क फिरताना आढळून आले. यापूर्वी महापालिका आणि पोलिसांनी विना मास्क फिरणाऱ्या लोकांना दंड ठोठावले आहेत. प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड अनेक वेळा वसूल केला. तरी देखील परभणी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये विना मास्क फिरणारे लोक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. ज्याची दखल आज स्वतः जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी घेतली आहे. या अनुषंगाने त्यांनी काढलेल्या आदेशात विना मास्क बाजारात किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्या नागरिकांना 200 रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. तर तोच नागरिक दुसऱ्यांदा विना मास्क आढळला तर त्याला 500 रुपयांचा दंड लावावा, असे देखील त्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट सांगितले आहे.

विशेष म्हणजे हे दंड लावण्याचे अधिकार त्यांनी महापालिका, नगरपालिका, पोलीस यंत्रणा, जिल्हा परिषदेचे अशा सर्वच शासकीय यंत्रणांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ज्यामुळे परभणी शहरातच नव्हे तर तालुका आणि ग्रामीण स्तरावर देखील विना मास्क फिरणाऱ्यांना दंडाची आकारणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपण शहरात नाहीत खेड्यात आहोत किंवा कॉलनी, नगरामध्ये फिरत आहोत, तसेच एखाद्या कार्यालयात फिरत आहोत, असे समजून विना मास्क फिरू नये. तसे आढळून आल्यास त्या ठिकाणचा अधिकारी किंवा कर्मचारी हा दंड वसूल करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.