परभणी - परभणी शहरातील नारायण चाळ भागात असलेल्या जुन्या चर्चसह शास्त्रीनगर आणि परसावत नगर या भागातील चर्चमध्ये आज नाताळ अर्थात ख्रिसमसचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. मध्यरात्री बारा वाजल्यापासूनच ख्रिस्ती बांधवांची उत्सवाची लगबग सुरू होती. या निमित्त सर्व चर्च रोषणाईने फुलून गेले होते.
हेही वाचा - ...मग झेड सुरक्षा कशाला, निलेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
संपूर्ण जगभर नाताळाचा सण आज 25 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्याचप्रमाणे परभणी शहरात देखील हा सण ख्रिस्ती बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला. काल रात्री बारा वाजल्यापासूनच नाताळच्या उत्सवाची तयारी सुरू झाली होती. शहरातील नारायण चाळ भागात ख्रिस्ती बांधवांचे जुने चर्च आहे. याठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून प्रार्थना करण्यासाठी ख्रिस्ती बांधव एकत्रित आले. त्याप्रमाणेच परसावत नगर आणि शास्त्रीनगर या भागातील चर्चमध्ये देखील ख्रिस्ती बांधवांनी आज प्रार्थना केली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. हे कार्यक्रम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.3
हेही वाचा - नाशिकच्या 'या' ठिकाणी आहे भारतातील सर्वप्रथम स्थापन झालेले बाळ येशूचे मंदिर