ETV Bharat / state

जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू... मात्र 'फिजिकल डिस्टन्स'चा फज्जा - फिजिकल डिस्टन्स परभणी बातमी

प्रवासी अनेक भागातून प्रवासासाठी येत आहेत. यात काही रेड झोनमधील प्रवासी आहेत. ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसचा वापर करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्याची गरज आहे.

bus-service-started-within-district-but-travelers-not-fallow-physical-distance-in-parbhani
जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू...
author img

By

Published : Jun 10, 2020, 5:52 PM IST

परभणी - कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता खबरदारी म्हणून लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. मागील दोन महिन्याहून अधिक काळ असलेल्या लाॅकडाऊमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. मात्र, आता लाॅकडाऊमधे शिथिलता मिळाल्याने परभणी जिल्ह्याअंतर्गत एसटी महामंडळाची बस सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे बस खचाखच भरुन धावत आहेत. बसमध्ये फिजिकल डिस्टन्सच्या नियमाची पायमल्ली केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू...

चारही आगारातून जिल्हाअंतर्गत बससेवा सुरू...

जिल्ह्यातील परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर या चारही आगारातून जिल्हाअंतर्गत बससेवेला गेल्या पंधरा दिवसांपासून प्रारंभ झालेला आहे. यामध्ये परभणी आगारात सेलूसाठी सकाळी 3 आणि संध्याकाळी 3 अशा बस धावत आहेत. याप्रमाणेच गंगाखेड, पाथरी आणि जिंतूर या तीनही आगारातून परभणीकडे तेवढ्याच बस धावत आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रतिसाद हा गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी या मार्गावर धावणार्‍या बसला मिळत आहे.

नियम धाब्यावर बसवून गर्दी...

मात्र, काही बस अक्षरशः पाच-दहा प्रवासी देखील घेऊन धावत आहेत. मात्र, सकाळी आणि सायंकाळी धावणार्‍या बसमध्ये तोबा गर्दी होत आहे. बसमध्ये बसण्यासाठी तसेच जागा पकडण्यासाठी नागरिक बसच्या दरवाजाजवळ प्रचंड गर्दी करत आहेत. आतमध्ये देखील दोन सीटवर एकाच व्यक्तीने बसावे असे निर्बंध असतानाही बसमध्ये प्रवासी गर्दी करत आहेत.

कोरोनाबाबात कोणतीही खबरदारी नाही...

विशेष म्हणजे प्रवासी बसताना किंवा उतरताना सॅनिटायझरचा वापर होत नाही. अनेकांकडून मास्कचा वापर देखील होताना दिसत नाही. शिवाय प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यासाठीचे कुठलीही साधने नाहीत. एसटी वाहक किंवा चालकाकडूनही गर्दी करणाऱ्या प्रवाशांना आवरण्याचा प्रयत्न होत नाही. महसूल मिळवण्यासाठी जेवढे प्रवासी बसमध्ये बसून इच्छीतात, त्या सर्वांना घेऊन बस पुढे धावत आहे. यातून फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.

'प्रवासी आमचं ऐकत नाहीत'...

प्रवासी अनेक भागातून प्रवासासाठी येत आहेत. यात काही रेड झोनमधील प्रवासी आहेत. ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी बसचा वापर करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने कोरोना संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात परभणीचे आगारप्रमुख दयानंद पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रवाशांना कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत. शेवटी आम्हाला महसूलही मिळवणे तितकेच महत्त्वाचे आहे. गाड्यांना खर्च 5 हजार येतो आणि महसूल 2 हजाराचा मिळतो, असे अनेकदा होत आहे. मात्र, नागरिकांनीच आपली स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.