ETV Bharat / state

संचारबंदी उठताच परभणीत नागरिकांची अक्षरश: झुंबड - citizens broke the rule

अगदी सुरुवातीपासून ग्रीनझोनमध्ये असणारा परभणी जिल्हा एका कोरोनाबाधित तरुणामुळे ऑरेंजझोनमध्ये गेला. त्यामुळे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी 23 आणि 24 एप्रिलच्या दोन दिवसीय संचारबंदीनंतर आज (शनिवारी) बाजारपेठ खुली करण्याचे आदेश दिले. दोन दिवसांची संचारबंदी उठताच आज (शनिवारी) सकाळी सात वाजल्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. कुठेही सोशल-डिस्टन्स पाळल्याचे दिसून आले नाही.

संचारबंदी उठताच परभणीत नागरिकांची अक्षरश: झुंबड

author img

By

Published : Apr 25, 2020, 1:12 PM IST

परभणी - दोन दिवसांची संचारबंदी उठताच आज (शनिवारी) सकाळी सात वाजल्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली. कुठेही सोशल-डिस्टन्स पाळल्याचे दिसून आले नाही. शिवाय तोंडाला मास्क न बांधणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती.

संचारबंदी उठताच परभणीत नागरिकांची अक्षरश: झुंबड

अगदी सुरुवातीपासून ग्रीनझोनमध्ये असणारा परभणी जिल्हा एका कोरोनाबाधित तरुणामुळे ऑरेंजझोनमध्ये गेला. त्यामुळे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी 23 आणि 24 एप्रिलच्या दोन दिवसीय संचारबंदीनंतर आज (शनिवारी) बाजारपेठ खुली करण्याचे आदेश दिले. अर्थात यामध्ये केवळ किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने यांनाच परवानगी देण्यात आली. याचा कालावधी सकाळी 7 ते दुपारी 2 असा ठेवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे बाजारपेठ खुली ठेवण्यासाठी केवळ आज (शनिवारी) 25 एप्रिल पुरताच आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्याने उद्या (रविवारी) 26 एप्रिलपासून बाजारपेठ उघडेल की नाही ? याची अनिश्चितता आहे. त्यामुळे नागरिकांनी शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून बाजारात खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली. किराणा, भाजीपाला घेण्यासाठी नागरिक दुकाने आणि रस्त्यावरच्या हातगाड्यांवर एकमेकांना खेटून उभे असल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे, सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीप्रमाणे परभणीच्या गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, स्टेशन रोड आदी भागात गर्दी झाली. ज्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहावयास मिळाले. यापैकी कुठेही सोशल डिस्टन्सचा अवलंब दिसून आला नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस देखील सोशल डिस्टनसाठी फारसा प्रयत्न करताना दिसले नाहीत. बाजारपेठेत काही विशिष्ट ठिकाणी फिरून पोलिसांनी आवाहन केले. मात्र, लोकांनी याकडे दुर्लक्षच केल्याचे दिसून आले. ज्याचा परिणाम शहरातील मुख्य बाजारपेठेसह अष्टभुजा देवी चौक, जुना पेडगाव रोड, वसमत रोडवरील सावली विश्रामगृहाच्या परिसरात हातगाड्यांवर लोकांची तोबा गर्दी झाली.

हेही वाचा - कोरोना अपडेट : राज्यात 394 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले; 18 जणांचा मृत्यू

आज चौथा शनिवारी असल्याने शहरातील बँका बंद होत्या. ज्यामुळे अनुदानाची रक्कम काढणाऱ्या ग्राहकांची गर्दी झाली नाही. गेले 35 दिवस शिस्तीत वागणारे लोक आता बेशिस्त होत आहेत. प्रशासनाला पुन्हा एकदा कठोर भूमिका घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.