ETV Bharat / state

पडघम विधानसभेचे.. परभणीतील चारही मतदारसंघासाठी भाजपकडून 51 इच्छुकांच्या मुलाखती - gangakhed

परभणीतील पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी या चारही विधानसभासाठी 51 इच्छुकांच्या पक्ष निरीक्षक तथा राज्यमंत्री संजय भेगडे यांनी मुलाखती घेतल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या दौऱ्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे सांगितले होते. परंतु या मुलाखती घेतल्याने भाजप स्वातंत्र्य लढण्याच्या विचारात दिसत आहेत.

भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या
author img

By

Published : Aug 31, 2019, 11:25 PM IST

परभणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणीच्या दौऱ्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपच्या वतीने प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यानुसार शनिवारी परभणीतील पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी या चारही विधानसभासाठी 51 इच्छुकांच्या पक्ष निरीक्षक तथा राज्यमंत्री संजय भेगडे यांनी मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे भाजप कुठेतरी स्वातंत्र्य लढण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते.

परभणीच्या चारही विधानसभा मतदार संघासाठी भाजपने घेतल्या 51 इच्छूकांच्या मुलाखती

हेही पाहा - सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे 17 नगरसेवकांसह भाजपवासी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश

मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमध्ये प्रामुख्याने पाथरी विधानसभेतून विद्यमान आमदार मोहन फड, गंगाखेडसाठी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विजय गव्हाणे, बालाजी देसाई, परभणीसाठी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. मीना परतानी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, त्यांची कन्या मेघना बोर्डीकर आणि माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा समावेश आहे.

या इच्छुकांनी दिल्या मुलाखती -
पाथरी विधानसभा मतदार संघासाठी आमदार मोहन फड, प्रा.पी.डी.पाटील, डॉ.मंजूषा चौधरी, शाम गलबे पाटील, बाबासाहेब फले, महादेव गिरे, रंगनाथ सोळंके, दत्तात्रय कदम, शिवाजी मव्हाळे, रमाकांत जहागीरदार, डॉ.उमेश देशमुख, हनुमान सावंत, गंगाखेड विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, सुरेश भुमरे, शामसुंदर मुंडे, लिंबाजी भोसले, अनंत बनसोडे, रमेश गोळेगांवकर, रामकिशन रौंदळे, विश्वनाथ सोळंके, विठ्ठल रबदडे, सुभाष कदम, विजय गव्हाणे, रामप्रभू मुंडे, गणेश रोकडे, डॉ.रामराव केंद्रे, गणेश घोरपडे, डॉ.बडेसाब शेख तर परभणी विधानसभा मतदार संघासाठी शहराध्यक्ष आनंद भरोसे, डॉ.मीना परतानी, मोहन कुलकर्णी, मंगल मुद्गलकर, अभिजीत धानोरकर, चंद्रकांत चौधरी, सुनिल देशमुख, रमेश गोळेगांवकर, शंकर भालेकर, अजय गव्हाणे तसेच जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे बोर्डीकर, समीर दुधगांवकर, गणेश काजळे, डॉ. माधव सानप, संजय साडेगांवकर, शशीकांत देशपांडे, राजेश वट्टमवार, खंडेराव आघाव, डॉ.गुलाब सांगळे, जिजाराव गिते आणि अशोक खताळ यांनी मुलाखती दिल्या.

Intro:परभणी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल परभणीच्या दौऱ्यात भाजप शिवसेनेची युती होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते; परंतु प्रत्यक्षात मात्र भाजपच्या वतीने प्रत्येक मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. त्यानुसार आज (शनिवारी) परभणीतील पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी या चारही विधानसभासाठी 51 इच्छुकांच्या पक्ष निरीक्षक तथा राज्यमंत्री संजय भेगडे यांनी मुलाखती घेतल्या आहेत. त्यामुळे भाजप कुठेतरी स्वातंत्र्य लढण्याच्या विचारात असल्याचे दिसून येते.Body:मुलाखती देणाऱ्या इच्छुकांमध्ये प्रामुख्याने पाथरी विधानसभेतून विद्यमान आमदार मोहन फड, गंगाखेडसाठी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, विजय गव्हाणे, बालाजी देसाई, परभणीसाठी जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. मीना परतानी आणि जिंतूर विधानसभा मतदारसंघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, त्यांची कन्या मेघना बोर्डीकर आणि माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांचे चिरंजीव समीर दुधगावकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, मागील दोन दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्ह्याचा दौरा केला. महाजनादेश यात्रेनिमित्त परभणीतील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी युती होणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते; परंतू पाथरी आणि जिंतूर येथील सभेत त्यांनी स्थानिक इच्छुकांना तुम्ही साथ देणार का ? असा सवाल जनतेला विचारला होता. त्यावरून भाजप पाथरी आणि जिंतूर ची जागा लढवण्याचा मनस्थिती दिसते. विशेष म्हणजे युतीच्या वाटाघाटीत पाथरी, जिंतूर आणि परभणी या तीनही जागा शिवसेनेच्या वाट्याला असतात. केवळ गंगाखेडची जागा भाजपला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र शिवसेनेच्या वाट्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये मुख्यमंत्र्यांची ही महाजनादेश यात्रा झाली. या तीनही ठिकाणी त्यांनी सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यावरून युुती किती प्रमाणात यशस्वी होईल, हे सांगणे अवघड झाले आहे.
परभणीच्या पाथरी मतदारसंघात भाजपचे सहयोगी आमदार मोहन फड हे 2014 ला निवडून आले आहेत. यावेळी तेच प्रमुख दावेदार मानले जातात. विशेष म्हणजे म्हणजे त्यांनी पाथरी येथील मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत पाथरीची जागा शिवसेनेला असून ती भाजपसाठी सोडून घ्यावी, अशी जाहीर मागणी केली होती. त्यावर परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणी जिल्ह्यातील चारही जागा निवडून आणू, अशी ग्वाही आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांना दिली. तसेच जनतेला उद्देशून तुमचा पुढचा आमदार मोहन फड असेल, असेही सांगितले होते. त्याप्रमाणेच सेलूच्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी मेघना बोर्डीकर यांना मतदार संघाचा अधिकार मिळवून जनतेचे कामे घेऊन माझ्याकडे पुढच्यावेळी या, असे सूचक विधान केल्याने त्यांना भाजपची उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले. एकूणच परभणी जिल्ह्यात कुठलेही अस्तित्व नसलेले भाजप आता मोठ्या ताकतीने विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी करत असल्याचे दिसून येते.

दरम्यान या संदर्भात बोलताना राज्यमंत्री संजय भेगडे यांनी पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आपण परभणीत चारही विधानसभा क्षेत्रातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. युती होईलच; परंतु जागेंबद्दलची बोलणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार आहेत. त्यानंतर युतीच्या जागा निश्चित होतील, असे सांगितले.

"या इच्छुकांनी दिल्या मुलाखती"

पाथरी विधानसभा मतदार संघासाठी आ.मोहन फड, प्रा.पी.डी.पाटील, डॉ.मंजूषा चौधरी, शाम गलबे पाटील, बाबासाहेब फले, महादेव गिरे, रंगनाथ सोळंके, दत्तात्रय कदम, शिवाजी मव्हाळे, रमाकांत जहागीरदार, डॉ.उमेश देशमुख, हनुमान सावंत, गंगाखेड विधानसभा मतदार संघासाठी जिल्हाध्यक्ष अभय चाटे, बालाजी देसाई, सुरेश भुमरे, शामसुंदर मुंडे, लिंबाजी भोसले, अनंत बनसोडे, रमेश गोळेगांवकर, रामकिशन रौंदळे, विश्वनाथ सोळंके, विठ्ठल रबदडे, सुभाष कदम, विजय गव्हाणे, रामप्रभू मुंडे, गणेश रोकडे, डॉ.रामराव केंद्रे, गणेश घोरपडे, डॉ.बडेसाब शेख तर परभणी विधानसभा मतदार संघासाठी शहराध्यक्ष आनंद भरोसे, डॉ.मीना परतानी, मोहन कुलकर्णी, मंगल मुद्गलकर, अभिजीत धानोरकर, चंद्रकांत चौधरी, सुनिल देशमुख, रमेश गोळेगांवकर, शंकर भालेकर, अजय गव्हाणे तसेच जिंतूर-सेलू विधानसभा मतदार संघासाठी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मेघना साकोरे बोर्डीकर, समीर दुधगांवकर, गणेश काजळे, डॉ.माधव सानप, संजय साडेगांवकर, शशीकांत देशपांडे, राजेश वट्टमवार, खंडेराव आघाव,डॉ.गुलाब सांगळे, जिजाराव गिते, अशोक खताळ.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_bjp_interview_vis & min_bhegde_byteConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.