ETV Bharat / state

शाळा भरली रेल्वेच्या डब्यात; शैक्षणिक गोडीसाठी पालमच्या आडगाव शाळेत अनोखा उपक्रम

आडगावच्या जिल्हा परिषद शाळेला आतून-बाहेरून सुंदररित्या रेल्वेचा डबा, पोस्ट ऑफिस, धावते एक्सप्रेसचे इंजिन इत्यादी चित्रांसहित रंगरंगोटी केली असल्याने शाळा नाविन्यपूर्ण दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल तर निर्माण झालेच आहे, त्याबरोबरच शाळेत येण्याची ओढही निर्माण झाल्याचे विद्यार्थी सांगताहेत.

parbhani
जिल्हा परिषद शाळा आडगाव
author img

By

Published : Dec 27, 2019, 12:41 PM IST

परभणी - विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करण्यासाठी तसेच शाळेचे स्वरूप आगळेवेगळे करण्याच्या उद्देशाने अनेक शाळा सजविण्यात येतात. मात्र, पालम तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळा चक्क रेल्वेच्या स्वरुपात रंगवण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून हे अनोखे अभियान राबविले जात असून या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, डिजिटल शाळेसाठी संगणक तसेच स्मार्ट टीव्हीद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणात समरस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

parbhani
रेल्वेच्या डब्ब्यासारखी दिसत असणारी जिल्हा परिषद शाळा आडगाव

महाराष्ट्र ग्राम परिवर्तन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १८ गावे निवडण्यात आली. त्यात पालम तालुक्यातील आडगाव या गावाचा समावेश आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना गावकऱ्यांच्या मदतीने गावात राबवणे, त्यातून शाश्वत विकासाची संकल्पना पुढे नेणे, हे मुख्य काम महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्थेचे (व्हिएसटीएफ) आहे. त्यात आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आधुनिक साहित्य, साधने व रंगरंगोटी करून ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. शाळेचे रूप पालटल्याने विद्यार्थ्यांचा उत्साहात वाढ होऊन शाळेत विद्यार्थीसंख्याही वाढल्याचे दिसत आहे. तसेच गावात शौचालयाची योजना, आरोग्यासाठी लसीकरण, जनावरांचे लसीकरण, स्वच्छता अभियान, अंगणवाडीसाठी साहित्य आदी कामे देखील होत आहेत.

शाळा भरली रेल्वेच्या डब्ब्यात

हेही वाचा - साप चावल्याने रुग्णाचा उपचाराअभावी मृत्यू, मृतदेह ताब्यात न घेण्याच्या भूमिकेमुळे तणाव

आडगावच्या या जिल्हा परिषद शाळेला सोलार युनिट, एलईडी टीव्ही, संगणक संच देण्यात आले असून शाळेला आतून-बाहेरून सुंदररित्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. ही रंगरंगोटी रेल्वेचा डबा, पोस्ट ऑफिस, धावते एक्सप्रेसचे इंजिन इत्यादी चित्रांसहित केली असल्याने शाळा नाविन्यपूर्ण दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल तर निर्माण झालेच आहे, त्याबरोबरच शाळेत येण्याची ओढही निर्माण झाल्याचे विद्यार्थी सांगताहेत. या उपक्रमासाठी व्हिएसटिएफचे जिल्हा समन्वयक योगेश जाधव, ग्राम परिवर्तक आनंद ओगले, शाळेचे मुख्याध्यापक एम.एम.शिवभक्त व शिक्षक परिश्रम घेत आहेत.

हेही वाचा - परभणी शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा; चर्चमध्ये करण्यात आली आकर्षक रोषणाई

Intro:परभणी - विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण करण्यासाठी तसेच शाळेचे स्वरूप आगळेवेगळे करण्याच्या उद्देशाने अनेक शाळा सजविण्यात येतात. मात्र पालम तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद शाळा चक्क रेल्वेच्या स्वरुपात रंगवण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून हे अनोखे अभियान राबविला जात असून या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, डिजिटल शाळेसाठी कंप्यूटर तसेच स्मार्ट टीव्हीद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणात समरस करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.Body:महाराष्ट्र ग्रामपरिवर्तन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 18 गावे निवडण्यात आली आहेत. त्यात पालम तालुक्यातील आडगाव या गावाचा समावेश आहे. शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना गावकऱ्यांच्या मदतीने गावात राबवणे, त्यातून शाश्‍वत विकासाची संकल्पना पुढे नेणे, हे मुख्य काम महाराष्ट्र ग्राम परिवर्तन संस्थेचे (व्हिएसटीएफ) आहे. त्यात आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आधुनिक साहित्य, साधने व रंगरंगोटी करून ग्रामीण भागात उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून शाळेचे रूप पलटून गेले आहे. तसेच गावात शौचालयाची योजना, आरोग्यासाठी लसीकरण, जनावरांचे लसीकरण, स्वच्छता अभियान, अंगणवाडीसाठी साहित्य आदी कामे देखील होत आहेत. जिल्हा परिषद शाळेला सोलार युनिट, एलईडी टीव्ही, संगणक संच देण्यात आले असून शाळेला आतून-बाहेरून सुंदररित्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. ही रंगरंगोटी रेल्वेचा डबा, पोस्ट ऑफिस, धावते एक्सप्रेसचे इंजिन या चित्रांसहित केली असल्याने शाळा नाविन्यपूर्ण दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यात कुतूहल तर निर्माण झालेच आहे, त्याचबरोबर शाळात येण्याची ओढ निर्माण झाली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. याकामी व्हिएसटिएफचे जिल्हा समन्वयक योगेश जाधव, ग्राम परिवर्तक आनंद ओगले, शाळेचे मुख्याध्यापक एम.एम.शिवभक्त व शिक्षक परिश्रम घेत आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & vis_ pkg
:- pbn_smart_school_vis_vo_pkg
- 1st byte :- student, 2nd :- मुख्याध्यापक एम.एम.शिवभक्त & 3rd byte:- ग्राम परिवर्तक आनंद ओगले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.