ETV Bharat / state

परभणीत कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या - जिंतूर

बँकेचे कर्ज कसे फेडायचे? हा प्रश्न त्यांना सतावत होता. ते मागील अनेक दिवसांपासून चिंतेत होते. यातूनच त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.

author img

By

Published : Jul 13, 2019, 11:18 PM IST

परभणी - सततचा दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने शनिवारी आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील भोसी येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सखाराम गंगाराम गायकवाड (६५) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना चार एकर शेती आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा मोठा परिवार आहे. मागील तीन वर्षांपासून सतत पडत असलेला दुष्काळ, त्यात वाढत चालले बँकेचे कर्ज यामुळे ते नेहमीच विवंचनेत असायचे. यावर्षी तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाची अवकृपा झाली. सध्या पेरणी केली असली तरी पावसाने दगा दिल्याने पीक येईल की नाही? याची धास्ती त्यांनी घेतली होती. शिवाय बँकेचे कर्ज कसे फेडायचे? हा प्रश्न त्यांना सतावत होता. ते मागील अनेक दिवसांपासून चिंतेत होते. यातूनच त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.

हा सर्व प्रकार त्यांच्या नातेवाईकांना शनिवारी सकाळी समजला. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Intro:परभणी - सततचा दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आज शनिवारी आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील भोसी येथे सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. Body:सखाराम गंगाराम गायकवाड (६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना चार एकर शेती आहे. मात्र मागील तीन वर्षांपासून सतत पडत असलेला दुष्काळ, त्यातच वाढत चालले बँकेचे कर्ज, यामुळे ते नेहमीच विवंचनेत असत. यातच यावर्षी तालुक्यात सुरुवातीपासूनच पावसाची अवकृपा झाली. सध्या पेरणी केली असली तरी पावसाने दगा दिल्याने पीक येईल की नाही? याची धास्ती त्यांनी घेतली होती. शिवाय बँकेचे कर्ज कसे फेडायचे ? या विवचंनेत ते मागील अनेक दिवसांपासून चिंतेत होते. यातूनच त्यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना त्यांच्या नातेवाईकांना शनिवारी सकाळी समजली. या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा मोठा परिवार आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- कृपया file photo वापरावा, ही विनंती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.