ETV Bharat / state

दिलासादायक : परभणीत 1 हजार 220 कोरोनामुक्त, 917 कोरोनाबाधितांची नोंद - कोरोनाची दुसरी लाट

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परभणीतही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात आज पहिल्यांदाच थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 1220 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत.

परभणीत 1 हजार 220 कोरोनामुक्त
परभणीत 1 हजार 220 कोरोनामुक्त
author img

By

Published : May 3, 2021, 9:43 PM IST

परभणी - राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. परभणीतही कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात आज पहिल्यांदाच परभणीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात 1220 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे. तर 917 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. सोबतच 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 8 पुरुष तर 3 महीलांचा समावेश आहे.

8012 बाधितांवर उपचार सुरू
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून 917 नवीन बाधित आढळले. तर 11 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या जिल्हा रुग्णालयातील कक्षात 8 हजार 12 बाधित उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत 928 करोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तसेच जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 39 हजार 173 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 30 हजार 223 जण कोरोनामुक्त झाले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे आतापर्यंत 2 लाख 51 हजार 287 व्यक्तींचे नमुने तपासण्यात आले. त्यात 2 लाख 12 हजार 56 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आले आहे. तर 39 हजार 173 व्यक्तींचे नमुने पॉझिटिव्ह आले.

परभणी जिल्ह्यात 344 बेड शिल्लक
दरम्यान, जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना रुग्णालयांसह खासगी मंगल कार्यालय आणि इतर इमारतींमधून 30 कोरोना हॉस्पिटल सुरू असून, या रुग्णालयांमध्ये 1839 बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी सध्या केवळ 344 बेड रिकामे आहेत. तर 1495 रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 6 हजार 517 रुग्ण होम आयसोलेशन उपचार घेत आहेत. सर्वाधिक बेड रेणुका हॉस्पिटल येथे 65 बेड्स रिकामे असून, त्याखालोखाल जिल्हा रुग्णालयाच्या आयटीआय हॉस्पिटलमध्ये 61 बेड्स तर जिल्हा रुग्णालयात 3, जिल्हा परिषद कोरोना हॉस्पिटल 55, परभणी आयसीयू 2, स्वाती 6, पाडेला 4, भारत हॉस्पिटल 31, डॉ. प्रफुल पाटील हॉस्पिटल 24, देशमुख 2, अक्षदा मंगल कार्यालय 26, प्राईम 5, मोरे 1 सामले 2, सिद्धिविनायक 5, ह्यात 3, सुरवसे मॅटर्निटी 2, देहरक्षा 16, पार्वती 8, स्पर्श हॉस्पिटल 14, तर गोकुळ हॉस्पिटलमध्ये 6 बेड शिल्लक आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या कोरोना रुग्णांनी बेड शिल्लक नसल्याच्या अफवांवर विश्वास न ठेवता या रुग्णालयांमध्ये संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला निवडणूक आयोग कारणीभूत; नवाब मलिकांचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.