ETV Bharat / state

परभणीत 78 केंद्रावर 32 हजार 715 पदवीधर मतदार बजावणार हक्क - जिल्हाधिकारी - parbhani district news

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 78 केंद्रावर 32 हजार 715 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्हाधिकारी मुगळीकर
जिल्हाधिकारी मुगळीकर
author img

By

Published : Nov 29, 2020, 1:29 AM IST

परभणी - मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 78 केंद्रावर 32 हजार 715 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत ही मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) दिली.

या संदर्भातील पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी मुगळीकर बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, निवृत्ती गायकवाड, नानासाहेब भेंडेकर आदीची उपस्थिती होती. दरम्यान, जिल्ह्यातील 78 केंद्रावर 6 हजार 770 महिला तर 25 हजार 945 पुरूष, असे एकूण 32 हजार 715 पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्व मतदान केंद्रावर अत्यावश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या असून सर्व मतदान केंद्र सॅनिटाईजेशन करून घेण्यात आले असल्याचेही यावेळी मुगळीकर म्हणाले.

सोमवारी पथके होणार रवाना, वाहनांना जीपीएस

कोरोनाच्या अनुषंगाने सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी यांना मास्कचा पुरवठा करून सॅनिटाइझर, थर्मलस्क्रीनिंग, ऑक्सीमिटरद्वारे तपासणी करून घेण्यात येणार आहे. सोमवारी (दि.30 नोव्हेंबर) रोजी मतदान पथके केंद्रावर रवाना होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान साहित्य वाटपासाठी 10 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी 30 क्षेत्रीय अधिकारी, 67 एकूण रूट गाईड, 374 मतदान अधिकारी, कर्मचारी, 100 सुक्ष्म निरीक्षक, 12 आरोग्य नोडल अधिकारी, 156 आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 78 केंद्रावर वेबकास्टींग करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर चित्रीकरण केले जाणार आहे. तर मतदान केंद्रावर जाणाऱ्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, मतपेट्या असलेले वाहन व मतदान पथकाच्या वाहनास जीपीएस बसविण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.

2014 ला होती 31 हजार 624 मतदारसंख्या

2014 च्या पदवीधर निवडणुकीत एकूण पदवीधर मतदारसंख्या 31 हजार 624 एवढी होती. त्यापैकी केवळ 11 हजार 139 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची टक्केवारी 35.22 एवढी होती. दरम्यान, यावेळी 31 दिव्यांग मतदार असून त्यापैकी 6 जणांनी टपाली मतदान केले, तर 25 जण प्रत्यक्ष केंद्रावर येवून मतदान करणार आहे. 80 वर्षावरील 8 ज्येष्ठ नागरिकांनी टपाली मतदान केले असून 7 जण प्रत्यक्ष केंद्रावर येवून मतदान करणार आहेत. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र जमा करून त्या औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्ट्रॉगरूमकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली.

हेही वाचा - परभणीत मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला 'स्वाभिमानी'ने घातला चपलांचा हार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.