ETV Bharat / state

मीटरमध्ये छेडछाड : परभणीतील ४ ग्राहकांनी केली १ लाख ५१ हजार रुपयांची वीजचोरी - Radio Frequency Data Concentrator

परभणी शहरातील ४ वीज ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आली आहे. यात त्यांनी १ लाख ५१ हजार ४४९ रुपयांची वीजचोरी केल्याचे उघड झाले असून, त्यांच्यावर वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल होणार आहेत.

Parbhani Mandal Office
परभणी मंडळ कार्यालय
author img

By

Published : Feb 24, 2021, 3:31 PM IST

परभणी - वीजचोरीला आळा बसावा यासाठी महावितरणतर्फे अनेक उपाय योजण्यात येत आहेत. त्यानुसार सध्या परभणी शहरात नवीन रेडिओ फ्रिक्वेंसीवर आधारित अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात येत आहेत. परंतु, या मीटरमध्ये देखील फेरफार करून वीजचोरी करण्यात येत आहे. परभणी शहरातील अशा ४ वीज ग्राहकांची वीजचोरी रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिटद्वारे (डीसीयू) उघडकीस आली आहे. यात त्यांनी १ लाख ५१ हजार ४४९ रुपयांची वीज चोरी केल्याचे उघड झाले असून, त्यांच्यावर वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल होणार आहेत.

हेही वाचा - परभणी पोलिसांनी जप्त केला दोन पिस्तूल, 13 काडतुसांसह गांजा आणि चरस

वीज चोरीची माहिती केंद्रीय सर्व्हरला मिळते

रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेंट्रेटर प्रणालीद्वारे होणाऱ्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीजचोरी करीत असेल तर त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. त्यामुळे, ग्राहकांकडून होणाऱ्या वीजचोरीस आळा बसण्यास मदत होणार आहे. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती येण्यास सुरवात झाली असून, परभणी शहरामधील ४ वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केला असता, त्याची माहिती केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये उपलब्ध झाल्याने त्या ग्राहकांची प्रत्यक्ष वीजचोरी पकडण्यात आली आहे.

माळी गल्लीतील ४ ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे निष्पन्न

परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद क्षीरसागर यांच्यासह जनमित्रांच्या पथकाने काल परभणी शहरातील माळी गल्लीतील विद्युत ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली. या ठिकाणी ४ मीटरमध्ये अनधिकृतपणे फेरफार करून वीजचोरी होत आसल्याचे निष्पन्न झाले.

मागील ७ ते ८ महिण्यांपासून परभणी शहरात आरएफ मीटर व डीसीयू युनिट बसवण्याचे काम चालू आहे. आजतागायत शहरात जवळपास ४५ हजार आरएफ मीटर्स बसवण्यात आले आहेत. उर्वरित ११ हजार मीटर्स बदलणे बाकी असून, ते येणाऱ्या पंधरा दिवसात बदलण्यात येतील.

मिटरची गती मंद करून वीजचोरी

दरम्यान, डीसीयू युनिटव्दारे टँपर डाटावरून कोणत्या मीटरमध्ये फेरफार केला आहे, याची माहिती उपलब्ध होत आहे. सदरील माहितीच्या आधारे ९ ग्राहकांच्या मीटरची तपासणी अँक्क्युचेकद्वारे करण्यात आली असता, त्यात ४ ग्राहकांच्या मीटरमध्ये अनधिकृतपणे मीटरला छेडछाड करून मीटरची गती मंद करून १० हजार ७०० युनिट वीज चोरी करत झाल्याचे आढळून आले. चार ग्राहकांचे स्थळ पंचनामे करण्यात आले असून संबंधितांवर भारतीय विद्युत कायदा २००३ चे कलम १३५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आजच्या एकूण ४ वीजचोरी प्रकरणात १ लाख ५१ हजार ४४९ रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

रेडिओ फ्रिक्वेंसी डेटाकॉन्सेंट्रेटर युनिट मानव विरहित प्रणाली

रेडिओ फ्रिक्वेंसी डेटाकॉन्सेंट्रेटर युनिट ही प्रणाली मानव विरहित असून या प्रणालीद्वारे ग्राहकांचे अचूक मीटर वाचन नोंदविले जात आहे. त्यामुळे, ग्राहकांची वीजबिलांबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. या प्रणालीद्वारे प्रत्येक ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध होत असून, दर १५ मिनिटांमध्ये ग्राहक किती विजेचा वापर करीत आहे ते बघता येईल. तसेच, त्या भागात वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर त्यावेळी किती वीजभार आहे याची अचूक माहिती देखील या प्रणालीमुळे मिळणार आहे. त्यामुळे, वीज ग्राहकांनी अधिकृतपणेच वीज वापर करावा, अन्यथा मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळल्यास वीज कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महावितरणने दिला.

हेही वाचा - परभणीत विदर्भातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीला बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.