ETV Bharat / state

Youth Dies Of Heart Attack : पोलीस भरतीचा सराव करताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू - police recruitment exercise

वसईत पोलीस भरतीसाठी सराव (police recruitment exercise) करताना एका २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू (Youth dies of heart attack) झाल्याची घटना घडली आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव असून तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. death due to heart attack, latest news from Vasai, latest news from Palghar

Youth Dies Of Heart Attack
हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू
author img

By

Published : Nov 15, 2022, 8:29 PM IST

वसई (पालघर) : वसईत पोलीस भरतीसाठी सराव (police recruitment exercise) करताना एका २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू (Youth dies of heart attack) झाल्याची घटना घडली आहे. प्रतीक महेंद्र मेहेर असे या तरुणाचे नाव असून तो मूळ विरारच्या अर्नाळा परिसरात राहणारा आहे. death due to heart attack, latest news from Vasai, latest news from Palghar

पोलीस शिपाई भरतीकरिता सराव सुरू- सराव करता करताच त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्याला मृत्यूने कवटाळले. वसई पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. राज्यात प्रथमच मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई भरती होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याचा कालावधी सुरू असून इच्छुक तरुण वर्ग यासाठी जोमाने सर्व तयारी करताना दिसत आहे. वसईतीलही अनेक तरुण यासाठी प्रयत्न करत असून त्यांचा सराव सुरू आहे.

पोलीस भरतीचे स्वप्न भंगले - यातीलच एक मूळचा अर्नाळा येथील मात्र वसई, रानगाव येथे राहणाऱ्या प्रतीक महेंद्र मेहेर (२२) याने देखील यासाठी सराव सुरु केला होता. लहानपणापासून पोलिसात भरतीचे होण्याचे स्वप्न पाहत असलेल्या या तरुणासाठी राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे एक संधी चालून आली होती. अर्ज भरल्यानंतर त्याने भरतीपूर्व सराव सुरु केला होता.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला - यासाठी व्यायाम, धावणे त्याचे नियमित सुरु होते. सोमवारी सायंकाळी प्रतीक वसईतील रस्त्यावर धावण्याचा सर्व करत होता. मात्र अचानक त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. प्रतीकच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रतीकचे पोलिसात भरती होण्याचे स्वप्न देखील भंग झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.