ETV Bharat / state

#लॉकडाऊन महाराष्ट्र : पालघरमधून 202 मजुरांची आपल्या राज्यात रवानगी - odisha labour palghar lockdown

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे मजूर याठिकाणी अडकले होते. हे मजूर वाडा तालुक्यातील कुडूस येथे कामाला होते. या सर्व मजूरांना आज (शनिवारी) त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले. काही मजुरांना रेल्वेने तर काहींना बसमधून पाठवण्यात आले.

workers from Telangana and Odisha sent to their hometown by bus and train from palghar
#लॉकडाऊन महाराष्ट्र : पालघरमधून 202 मजूरांची आपल्या राज्यात रवानगी
author img

By

Published : May 16, 2020, 7:49 PM IST

वाडा (पालघर) - जिल्ह्यात लॉकडाऊन काळात अडकलेल्या ओडिशातील 202 मजूरांना आज (शनिवारी) त्यांच्या राज्यात रवाना करण्यात आले. काही मजुरांना रेल्वेने तर काहींना बसमधून पाठवण्यात आले. पालघर रेल्वे स्थानकातून त्यांनी रवानगी करण्यात आली.

कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्यामुळे मजूर याठिकाणी अडकले होते. हे मजूर वाडा तालुक्यातील कुडूस येथे कामाला होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात येत होती, अशी माहिती तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली. यासोबतच तालुकयातील वसुरी येथील कॅम्पमधील 26 मजुरांना ही राज्य परिवहन महामंडळ (एसटी) बसने तेलंगाणा राज्यात रवाना करण्यात आले. तालुक्यातील अजून काही अडकलेल्या मजुरांना पाठविण्याची प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती तहसीलदार कदम यांनी दिली.

हेही वाचा - परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धवली 'लालपरी'; 200 नागरिकांना घरी पाठवण्यास लावला हातभार

पालघर जिल्ह्यातील कुडुस, खनिवली, अबिटघर, कोंढला, वसुरी, खरिवली, कंचाड या भागात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. यामुळे याठिकाणी परराज्यातील कामगार या मोठ्या प्रमाणात कामासाठी येत असतात. त्याचबरोबर नाका कामगार मजूर येथे बांधकामासाठी येथे येत असतो.

यावेळी प्रांताधिकारी अर्चना कदम, तहसीलदार उध्दव कदम, नायब तहसिलदार लहांगे, रिताली परदेशी तसेच मंडळ अधिकारी, तलाठी यांची मदत झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.