ETV Bharat / state

Palghar : पुरोगामी महाराष्ट्रातील धक्कादायक घटना; अंधश्रद्धेतून महिलेवर भुताटकीचा आरोप - Superstition case resgister vada police station in palghar

पुरोगामी महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक हळदी समारंभात आदिवासी महिलेला चेटकीण ठरवले आहे.याप्रकरणी महिलेने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ( Woman Register Case Against Two Man On Superstition )

Superstition
Superstition
author img

By

Published : Jun 8, 2022, 4:47 PM IST

पालघर - पुरोगामी महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एक हळदी समारंभात आदिवासी महिलेला चेटकीण ठरवले आहे. हळदीला आलेल्या दोन तरुणांनी महिलेला चेटकीण ठरवत तिच्यावर भुताटकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार वाडा पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Woman Register Case Against Two Man On Superstition ) आहे.

ही घटना आहे वाडा तालुक्यातील बेरशेती गावातील. येथील अनंता पाटील यांचा मुलगा रूपेशच्या विवाहानिमित्तानं २५ मेच्या रात्री हळदीसमारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पारंपरिक पध्दतीने कुळदैवतांची पूजा करताना सागर विनायक पाटील आणि करण अंकुश पाटील यांनी अंगात वारा आल्याचे सांगत त्यांनी घरातील सर्व उपस्थितांना मांडवात जायला सांगितले. त्यानंतर भंडारा उधळत सागरने एका आदिवासी महिलेच्या हाती पहार देत मंडपाच्या मध्यभागी असलेल्या खांबाजवळ खोदायला सांगितले. त्या महिलेने नकार दिल्यावर जबरदस्तीने तिच्या मानेला धरत या खांबाजवळ बसविले. मग सागरने त्या खोदलेल्या जागेतून देवीची लहान मूर्ती काढली. या महिलेपासून सावध रहा, असे ओरडून सांगू लागला. त्या महिलेची ओवाळणी करत तिच्या अंगावर भंडारा उधळला आणि नारळ देखील फोडला. त्यानंतर ह्या महिलेबद्दल जातीवाचक बोलत ती भुताटकी करतेय, असा आरोप सागर आणि करण पाटील याने केला. त्यामुळे येथील नागरिकांसमोर महिलेती मानहानी झाल्याची घटना घडली आहे.

महिलेची प्रतिक्रिया

या घटनेनंतर पीडित महिलेने आरोपी भगत सागर पाटील आणि करण पाटील यांच्याविरोधात वाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. आरोपींविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने ग्रामीण भागात अंधश्रध्देच्या घटना वाढू लागल्याचे पुढे आले असून, अशा घटनांनी एखाद्या कुटुंबांवर आपलं स्वत्व गमावण्याची वेळ यावी हे अधिक चिंताजनक आहे.

हेही वाचा - Navneet Rana : 'सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या समस्या...'; नवनीत राणांचा ठाकरेंना सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.