ETV Bharat / state

रानभाज्या आणि खेकडे बाजारात दाखल, महागाईमुळे रानभाज्यांना ग्राहकांची पसंती - wada news

या जंगली भाज्या औषधीसुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापूर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात.

रानभाज्या
author img

By

Published : Jun 29, 2019, 5:24 PM IST

पालघर (वाडा)- पावसाळा सुरू झाला की रानभाज्या बाजारात येण्यास सुरूवात होते. जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते. या भाज्यांबरोबरच खेकडेही बाजारात विकायला येतात. रानभाज्या आणि खेकडे या दिवसांमध्ये कमी किमतीत उपलब्ध होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आवर्जुन त्यांची खरेदी करतात.

रानभाज्या आणि खेकडे बाजारात दाखल

या जंगली भाज्या औषधीसुद्धा असतात. तसेच पावसाळ्यापुर्वी इतर भाजीपाला महागलेला असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक या रानभाज्यांना पसंती देतात. वाडा शहरातील बाजारपेठेत मोखाडा येथील सुर्यमाल, जव्हार, विक्रमगड आणि वाडा या डोंगराळ भागातील लोक शेवळी, लोत, कोळीभाजी, बाफली, दिंडे या सारख्या रानभाज्या व खेकडे बाजारात विकायला आणतात.

एक जुडी १० रूपयांत अशी रानभाजी विकली जाते. तर खेकडे प्रती नग तीन ते चार रुपयांना विकले जातात.

Intro:रानभाज्या आणि खेकडे बाजारात दाखल
महागाईत रानभाज्या ग्राहकांच्या पसंतीला
पालघर (वाडा)- संतोष पाटील
पावसाळा सुरू झाला की रानभाज्याची बाजारात येण्याची सुरूवात होते.या रानभाज्यां रेलचेलीबरोबरच खेकडे ही बाजारात दाखल होत असतात.रानभाज्या आणि खेकडे येथील ग्रामीण भागातील जनतेला महागाईच्या काळातील या रानभाज्या कमी किमतीत उपलब्ध होऊन त्या औषधीसुद्धा असतात.तर खेकडे ही आवर्जून खाल्ले जातात.
वाडा शहरातील बाजारपेठेत मोखाडा येथील सुर्यमाल, जव्हार, विक्रमगड आणि वाडा याभागातील डोंगराळ भागातील लोक रानभाज्या मधील शेवळी, लोत, कोळीभाजी,बाफली,दिंडे या सारख्या रानभाज्या व खेकडे घेऊन विकत असतात.एक जुडी 10 रूपयात अशी रानभाजी विकली जात असते.तर खेकडे प्रति नग तीन -चार रुपयाने विकले जातात.
जंगलातून आणलेल्या या रानभाज्या औषधी असल्याने ग्राहकांची झुंबड उडत असते.
Body:Video वाडा बाजारपेठेतील Conclusion:Ok
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.