ETV Bharat / state

जयसागर धरणात दोन दिवसापुरताच पाणीसाठा; जव्हार शहरात भीषण पाणीटंचाई - जव्हार

जव्हार शहराची लोकसंख्या १५ हजारांच्याही पलीकडे गेली आहे. दोन ते चार हजार लोकसंख्या लक्षात घेऊन ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाचा पाणीसाठा हा लोकसंख्या वाढीमुळे अपुरा पडू लागला आहे.

जयसागर धरणातील पाणीसाठी
author img

By

Published : Jun 24, 2019, 12:10 PM IST

पालघर - जिल्ह्यातील जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणात फक्त २ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

जयसागर धरणातील पाणीसाठी

१४ सप्टेंबर १९६१ साली जव्हारचे संस्थानचे राजे यशवंतराव मुकणे यांनी जव्हारच्या दोन ते चार हजार लोकसंख्येसाठी जयसागर धरण बांधले होते. आजही येथील नागरीक याच धरणातील पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. मात्र, आता जव्हार शहराची लोकसंख्या १५ हजारांच्याही पलीकडे गेली आहे. दोन ते चार हजार लोकसंख्या लक्षात घेऊन ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाचा पाणीसाठा हा लोकसंख्या वाढीमुळे अपुरा पडू लागला आहे.

जून महिना संपत आलेला आहे. मात्र, अद्यापही पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे तळ गाठू लागली आहेत. जयसागर धरणातही २ दिवसापुरताच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाण्याची पातळी अगदी खालावली असून निव्वळ चिखल आणि गढूळ पाणी दिसायला लागले आहे. त्यामुळे जव्हार शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील नागरिकही धास्तावले आहेत. आता जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शहरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जव्हार नगरपरिषदेमार्फत २१, २५ आणि 30 जूनला फक्त अर्धा तास पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरिकांना दोन ते अडीच हजार रुपये खर्चून टँकरने आणलेले पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यामध्ये साचलेला गाळ काढलेला नाही. शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी नगरपरिषदेने ४ वर्षांपूर्वी शहरालगत असलेल्या खडखड धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतचा जवळपास ७ कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र, खडखड धरणातील पाणीपुरवठा संबंधीचा हा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. वर्षभरातच खडखड धरणातील पाणी जव्हारला पुरवण्यासाठी टेंडर काढून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल, असे नगरपरिषदेमार्फत सांगण्यात आले. मात्र, आजही जव्हारचा पाणीप्रश्न सुटलेला नाही.

Intro:जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणात दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
पाण्याची दाहकता वाढली नागरिकांना करावा लागणार भीषण पाणीटंचाईचा सामनाBody:जव्हार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जयसागर धरणात दोन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा
पाण्याची दाहकता वाढली नागरिकांना करावा लागणार भीषण पाणीटंचाईचा सामना

नमित पाटील,
पालघर, दि.24/6/2019

जुलै महिना उजाडला तरीही पाऊसच न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे तळ गाठू लागली आहेत. जव्हार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जयसागर धरणात अतीअल्प म्हणजेच दोन दिवस पाणी पुरेल ऐवढाच पाणी साठा शिल्लक आहे. धरणातील पाण्याची पातळी अगदी खालावली असून, निव्वळ चिखल व गढूळ पाणी दिसू लागले आहे. जव्हार शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होणार असल्याने येथील नागरिकाही धास्तावले असून जव्हारकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. शहरातील नागरिकांना स्थलांतर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जव्हार नगरपरिषदेमार्फत 21, 25 व 30 जून रोजी फक्त अर्धा तास पाणीपुरवठा केला जाईल अशी दवंडीही शहरात पिटण्यात आली व नोटीसही काढण्यात आली. त्यामुळे येथील नागरिकांना दोन ते अडीच हजार रुपये खर्चून टँकरने आणलेले पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

14 सप्टेंबर 1961 साली जव्हारचे संस्थानचे राजे यशवंतराव मुकणे यांनी त्याकाळी जव्हारच्या दोन ते चार हजार लोकसंख्येकरीता शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जयसागर धरण बांधले होते. आजही येथील नागरीक याच धरणातील पाण्यावर नागरिक अवलंबून आहेत. मात्र आता जव्हार शहराची लोकसंख्या 15 हजारांच्याही पलीकडे गेली असून दोन ते चार हजार लोकसंख्या लक्षात घेऊन 60 वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाचा पाणीसाठा हा लोकसंख्या वाढीमुळे अपुरा पडू लागला आहे.

धरणाचे बांधकाम केल्यापासून त्यात साचलेला गाळ काढलेला नाही. धरणात साचलेला गाळ काढण्यासाठी वर्षभरापूर्वी टेंडर काढूनही गाळ काढला गेलेला नाही. जव्हार शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी नगरपरिषदेने चार वर्षापूर्वी शहरालगत असलेल्या खडखड धरणातून जव्हार शहराला पाणी पुरवठा करण्याबाबतचा जवळपास ७ कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र खडखड धरणातील पाणीपुरवठा संबंधीचा हा प्रस्ताव मंत्रालयात धूळखात पडला आहे. वर्षभरातच खडखड धरणातील पाणी पुरवठा जव्हारला करण्यासाठी टेंडर काढून पाणी प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येईल असे नगरपरिषदेमार्फत सांगण्यात आले. मात्र आजवर जव्हारचा पाणीप्रश्न आजवर सुटलेला नाही, उलट पाण्याची दाहकता अधिकच वाढली असून नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Byte:- असरफ घाची, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.