ETV Bharat / state

पालघरमधील सुथेडपाडा, भेंडीपाडा येथे पाणी प्रकल्प सुरू, महिलांची पायपीट थांबणार

जिल्ह्यातील तलासरी ब्लॉकमधील बोरमाळ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या गावांतील पिण्याच्या पाण्याचे 2 शाश्वत प्रकल्पांचे लार्सन अँड टुब्रो चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हस्तांतरण करण्यात आले.

पालघरमधील सुथेडपाडा आणि भेंडीपाडामध्ये पाणी प्रकल्प सुरू, महिलांची पायपीट थांबणार
author img

By

Published : Jul 7, 2019, 7:40 AM IST

पालघर - जिल्ह्यातील तलासरी ब्लॉकमधील बोरमाळ ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या गावांतील पिण्याच्या पाण्याचे 2 शाश्वत प्रकल्पांचे लार्सन अँड टुब्रो चॅरिटेबल ट्रस्टतर्फे हस्तांतरण करण्यात आले. ग्रामीण व आदिवासी समाजासाठी हे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार आहे.

ग्रामउर्जाच्या सहकार्याने हे पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प राबवण्यात आले. नंतर स्थानिक ग्रामपंचायतीला त्याचे वितरण करण्यात आले. एलटीपीसीटीची भागीदार ग्रामउर्जातर्फे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा परिषद, पालघर, एलटीपीसीटीचे विश्वस्त आणि स्थानिक गावकरी उपस्थित होते. हस्तांतरण कार्यक्रमात पंचायत समिती तळासारी (ब्लॉक स्तरीय) आणि ग्राम पंचायत (गाव स्तरीय) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

या प्रकल्पामध्ये नव्या बोअरवेल्स, सौर उर्जा पाण्याचे पंप, पाइपलाइन, स्टोअरेज टँक, वितरण पाइपलाइन आणि पाणी वितरण स्टँड यांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 10 स्टँड पोस्ट्स उभे करण्यात आले आहेत. आता एआरडीडब्ल्यूपी मापदंडानुसार गावातील प्रत्येक घरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 2 गावांचा समावेश करण्यात आला होता. यापुढे पालघर जिल्ह्यातील तळासारी ब्लॉकमधील आणखी गावांना सहभागी करून घेतले जाणार आहे. पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत, पाण्याचा दर्जा, पाण्याची मागणी आणि पाणी काढण्यासाठी स्त्रियांना करावा लागणारा त्रास इत्यादी बाबी लक्षात घेऊन सुथेडपाडा आणि भेंडीपाड्यासाठी पिण्याच्या पाण्याची यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.

Intro:जिल्हा परिषद आणि एलटीपीसी ट्रस्ट तर्फे तलासरीमधील सुथेडपाडा आणि भेंडीपाडा आदिवासी
पाड्यात पाण्याचा प्रकल्प; आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणारBody:जिल्हा परिषद आणि एलटीपीसी ट्रस्ट तर्फे तलासरीमधील सुथेडपाडा आणि भेंडीपाडा आदिवासी
पाड्यात पाण्याचा प्रकल्प; आदिवासी महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार

नमित पाटील,
पालघर, दि.6/7/2019

पालघर जिल्ह्यातील तलासरी ब्लॉकमधील बोरमाळ ग्रामपंचाय अंतर्गत येणाऱ्या सुथेडपाडा आणि भेंडीपाडा या गावांतील ग्रामीण व आदिवासी समाजासाठी पिण्याच्या पाण्याच्या दोन शाश्वत प्रकल्पांचे लार्सन अँड टुब्रो चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे हस्तांतरण करण्यात आले. विशेष म्हणजे या प्रकल्पामुळे महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी होंमारी पायपीट थांबणार आहे. ग्रामउर्जा च्या सहकार्याने हे पिण्याच्या पाण्याचे प्रकल्प राबवण्यात आले व नंतर स्थानिक ग्रामपंचायतीला त्याचे वितरण करण्यात आले. एलटीपीसीटीची भागीदार ग्रामउर्जा तर्फे हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, जिल्हा परिषद, पालघर, एलटीपीसीटीचे विश्वस्त आणि स्थानिक गावकरी उपस्थित होते. हस्तांतरण कार्यक्रमात पंचायत समिती तळासारी (ब्लॉक स्तरीय) आणि ग्राम पंचायत (गाव स्तरीय) यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला.

या प्रकल्पामध्ये नव्या बोअर वेल्स, सौर उर्जा पाण्याचे पंप, पाइपलाइन, स्टोअरेज टँक, वितरण पाइपलाइन आणि पाणी वितरण स्टँड यांचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत एकूण 10 स्टँड पोस्ट्स उभे करण्यात आले आहेत. आता एआरडीडब्ल्यूपी मापदंडानुसार गावातल्या प्रत्येक घरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दोन गावांचा समावेश करण्यात आला होता व यापुढे पालघर जिल्ह्यातील तळासारी ब्लॉकमधील आणखी गावांना त्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. पाण्याचा खात्रीशीर स्त्रोत, पाण्याचा दर्जा, पाण्याची मागणी आणि पाणी काढण्यासाठी स्त्रियांना करावा लागणारा त्रास इत्यादी बाबी लक्षात घेऊन सुथेडपाडा आणि भेंडीपाड्यासाठी पिण्याच्या पाण्याची यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.