ETV Bharat / state

नव्या पंचायत समिती कार्यालयाचा प्रस्ताव मंत्रालयाच्या दरबारी रखडला; जुन्या इमारतीच्या डागडुजीवर भर

वाडा पंचायत समितीच्या नवीन जागेचा प्रस्ताव काही तांत्रिक अडचणीमुळे मुख्य वास्तू शास्ञज्ञ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रखडला. त्यामुळे जुन्याच कार्यालयाच्या डागडुजीवर भर देण्यात येत आहे.

नव्या पंचायत समिती कार्यालयाचा प्रस्ताव मंत्रालयाच्या दरबारी रखडला
author img

By

Published : May 31, 2019, 1:45 PM IST

पालघर - वाडा पंचायत समितीच्या नवीन जागेचा प्रस्ताव काही तांत्रिक अडचणीमुळे मुख्य वास्तू शास्ञज्ञ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रखडला. त्यामुळे जुन्याच कार्यालयाच्या डागडुजीवर भर देण्यात येत आहे.

नव्या पंचायत समिती कार्यालयाचा प्रस्ताव मंत्रालयाच्या दरबारी रखडला

वाडा तालुक्याच्या पंचायत समितीचा सत्ता कारभार बदलाची नोंद ही सन १९६२-६३ च्या दरम्यान पंचायत समितीच्या दालनात दिसून येते. अनेक सत्ताधाऱ्यांचा काळ लोटला पण ही जीर्ण इमारत सत्ता बदलाची साक्ष देत राहिली. या इमारतीचे भूमिपूजन सन १९७१-७२ च्या तत्कालीन अन्नपुरवठा मंत्री भाऊसाहेब वर्तक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर या इमारतीवर डागडुजीवर लाखो रुपयांचा खर्च केला गेला.

दरम्यान, याही वर्षी शेष फंडातून २१ लाख रूपये इमारतीच्या डागडुजीवर खर्च केले जात आहे, अशी माहिती वाडा पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता धनंजय जाधव यांनी यावेळी दिली. तर पंचायत समितीचे माजी उपसभापती नंदकुमार पाटील यांनी सदर नव्या इमारतीत कार्यालयासाठी दोन जागेचा प्रस्ताव मुख्य वास्तू शास्त्रज्ञ सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई येथे पाठविला आहे. यासंदर्भात आमचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे. लवकरच हा प्रस्ताव मार्गी लागून नव्या इमारती कार्यालयाचा प्रश्न सुटेल, असे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

---------- Forwarded message ----------
From: Santosh Patil <santosh.patil@etvbharat.com>
Date: Thursday, May 30, 2019
Subject: MH-pal (wada) new block office building pending. Investigation story
To: Marathi Desk <marathidesk@etvbharat.com>

नव्या पंचायत समिती कार्यालयाचा प्रस्ताव मंञालयाच्या दरबारी रखडल्याने 
जुन्या इमारतीला डागडुजीचा भर

वाडा (पालघर)- संतोष पाटील 

वाडा पंचायत समितीच्या नवीन जागेचा प्रस्ताव काही तांत्रिक अडचणीमुळे मुख्य वास्तू शास्ञज्ञ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रखडल्याने जुन्याच इमारती कार्यालयाला डागडुजीवर भर देण्यात येतोय.  
वाडा तालुक्याच्या पंचायत समितीचा सत्ता कारभार बदलाची नोंद ही सन. 1962 - 63 च्या दरम्यान पंचायत समितीच्या दालनात दिसुन येते.
अनेक सत्ताधाऱ्यांचा काळ लोटला पण ही जीर्ण इमारत कार्यालय  सत्ता बदलाची साक्ष देत राहीली.
या इमारतीचे भूमिपूजन सन.1971-72 च्या तत्कालीन अन्नपुरवठा मंञी भाऊसाहेब वर्तक यांच्याहस्ते झाल्याचे दिसून येतेय. त्यानंतर या इमारतीवर डागडुजीवर लाखो रुपयांचा खर्च केला गेला.
याही वर्षी शेष फंडातून  21 लाख रूपये इमारतीच्या डागडुजीवर खर्च केले जात असल्याची माहिती वाडा पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता धनंजय जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. 
तर नव्या पंचायत समितीच्या  इमारती कार्यालयासाठी व त्याच्या जागेसाठी  आग्रही असणारे पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत विद्यमान सदस्य यांनी सदर नव्या इमारती कार्यालयासाठी दोन जागेचा प्रस्ताव मुख्य वास्तू शास्ञज्ञ सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे पाठविला आहे.आमचा सातत्याने पाठपुरावा चालू आहे. लवकरच हा प्रस्ताव मार्गी लागून नव्या इमारती कार्यालयाचा प्रश्न सुटेल असे त्यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना माहीती दिली.

व्हिज्युअल-  जुने पंचायत समिती कार्यालय
बाईट- माजी उपसभापती नंदकुमार पाटील यांची प्रतिक्रिया 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.