ETV Bharat / state

खाकीतील माणुसकी..! विरारमध्ये 'त्या' मृतदेहावर पोलिसाकडून अंत्यसंस्कार - Maharashtra police

विरार पुर्वेकडील फुलपाडा येथे प्रमोद खारे यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. पण, टाळेबंदीमुळे त्यांचे कुटुंबिय इतर ठिकाणी अडकले होते. त्यामुळे ते विरारला येऊ शकत नव्हते. त्यामुळे पोलिसानेच अंत्यसंस्कार करावा, अशी विनंत खारे यांच्या कुटुंबियांनी केली. त्यानुसार पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी अंत्यसंस्कार केले.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 10, 2020, 8:29 PM IST

Updated : May 10, 2020, 9:08 PM IST

विरार (पालघर) - कोरोनामुळे संपूर्ण राज्यात हाहाकार परसरला असताना पोलीस विभाग मात्र आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. या खाकी वर्दीतली माणूसकी आपण सगळ्यांनी पाहिली आहे. असाच एका मनाला घर करणारा प्रकार पालघच्या विरारमध्ये समोर आला आहे. विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाकीतील माणुसकी पहायला मिळाली.

खाकीतील माणुसकी..! विरारमध्ये 'त्या' मृतदेहावर पोलिसाकडून अंत्यसंस्कार

विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील प्रमोद खारे (वय 45 वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल. मात्र, कोणीही नातेवाईक लॉकडाऊनमुळे येऊ न शकल्याने पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी पुढाकार घेत मृतदेहावर अंतिम संस्कार केला. यावेळी त्यांनी नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून दर्शन घडवले. फुलपाडा येथे प्रमोद खारे हे घरी एकटेच राहतात. अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, लॉकडाऊन असल्यामुळे त्यांचे नातेवाईक कोलकाता आणि दिल्लीवरून अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाही. त्यामुळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणीही नव्हते. मात्र, पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी मृत प्रमोद खरे यांचा बंद झालेला मोबाईल चार्ज करून नातेवाईकांशी संपर्क साधला.

लॉकडाऊनमुळे नातेवाईकांना येण्यासाठी एक दिवस प्रेत राखून ठेवले होते. मात्र, त्यांना येता आले नाही. नातेवाईकांनी पोलीस सुभाष यांना अंत्यसंस्कार करण्यास विनंती केली आणि अखेरच दर्शन व्हिडीओ कॉलद्वारे घेऊन साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. अशा या योध्याने केलेल्या कामाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. त्यांच्या या माणूसकीचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

हेही वाचा - विरारमध्ये वाईन शॉप बाहेर मद्यपींचा राडा; उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फटके देऊन हाकलले

Last Updated : May 10, 2020, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.