पालघर - सफाळे जवळील मांडे येथील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संयुक्त मोजणीचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना आज पिटाळून लावत हाणून पाडला. आश्चर्याची बाब म्हणजे शेतात आवणीची कामे सुरू असताना शेतात शिरून अधिकाऱ्यांनी मोजणीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ग्रामस्थ शेतकरी प्रचंड संतापले.
बुलेट ट्रेन प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून ही मोजणीच बेकायदेशीर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मांडे गावच्या ग्रामसभेने बुलेट ट्रेन विरोधी ठराव यापूर्वीच शासनाला सादर केला आहे. असे अजूनसुद्धा मोठा पोलीस फौजफाटा घेऊन बुलेट ट्रेनच्या संयुक्त मोजणीसाठी अधिकारी भात शेतीची कामे करत असलेल्या गावकऱ्यांच्या शेतजमिनीत दाखल झाले आणि मोजणी करण्याचा प्रायत्न केला. परंतु, शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत ही संयुक्त मोजणी हाणून पडली व अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.