वसई (पालघर) - नियम न पाळणाऱ्या दुकानांवर कारवाईत वसई महापालिका भेदभाव करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विरार पश्चिम बोलिंज नाका येथील शेजारीच असलेल्या चिकन आणि मटणाच्या दुकानावर कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईत महापालिका भेदभाव करत असल्याचे समोर आले आहे.


शनिवारी सकाळी महापालिकेच्या नियम न पाळणाऱ्या दुकानांवर केलेल्या कारवाईत चिकनच्या दुकानाला दोन हजाराचा रुपयांचा दंड केला. तर मटणाच्या दुकानाला एक हजार रुपयाचा दंड आकारला आहे. ही कारवाई पालिकेच्या अतिक्रमण पथकाने केली. दरम्यान, या वेगवेगळा दंड आकारल्यामुळे चिकन विक्रेते आणि अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. लॉकडाऊन काळात महापालिकेकडून मनमर्जी दंड वसूल करत असल्याचा आरोप येथील लोकांनी केला आहे.