विरार (पालघर) - मुंबईतील जोगेश्वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोघा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाईक राईडचा आनंद बेतला जीवावर, जोगेश्वरीतील दोघे तरुण विरार येथील तलावात बुडाले! - virar youth drowned news
बाईक राईडचा आनंद घेण्यासाठी जोगेश्वरी येथील तरुण भाटपाडा येथे आले होते. त्यानंतर त्यांनी येथील तलावाकडे आपला मोर्चा वळविला. परंतु तेथे काठावर उभे असताना दोघेही पाय घसरुन तलावात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी बचावकार्य राबविले असता दोघांचाही मृतदेह आढळून आला.
जोगेश्वरीतील दोघे तरुण विरार येथील तलावात बुडाले!
विरार (पालघर) - मुंबईतील जोगेश्वरी येथून विरार पूर्व येथील भाटपाडा येथे बाईक राईडसाठी आलेल्या दोघा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास घडली. बुडालेल्या दोघाही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Last Updated : Sep 13, 2020, 8:33 PM IST