ETV Bharat / state

गुन्हे शाखेकडून दुचाकी चोर जेरबंद, 3 दुचाकी जप्त - Palghar crime news

स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव यांना एका दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान बिल्ला पासवान या दुचाकी चोराबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

Two-wheeler burglar arrested
गुन्हे शाखेकडून दुचाकी चोर जेरबंद
author img

By

Published : Dec 4, 2019, 11:21 PM IST

पालघर - बोईसरमधील विविध भागातून दुचाकी चोरी करणाऱ्या चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या चोरट्याकडून 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामनंदन ऊर्फ बिल्ला गणेश पासवान (वय 19 वर्षे, रा.धोडीपूजा) असे सदर चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा - कांदा रडवणार! कांद्याने पार केली 'शंभरी'

स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव यांना एका दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान बिल्ला पासवान या दुचाकी चोराबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

हेही वाचा - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, पालघरमधील शेतकऱ्यांची मागणी

आरोपीकडून बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेली 76 हजार रुपये किमतीची युनिकॉर्न दुचाकी व 65 हजार रुपये किमतीची होंडा शाईन अशा 2 तर मनोर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केलेली 20 हजार रुपये किमतीची अ‍ॅक्टीवा स्कुटी अशा 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी बिल्ला पासवान विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

बिल्ला पासवान या अटक करण्यात आलेल्या चोरट्याविरोधात गुजरातमधील उमरगाव पोलीस ठाण्यातही दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

Intro:  बोईसर येथे दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक; 3 दुचाकी हस्तगतBody:  बोईसर येथे दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक; 3 दुचाकी हस्तगत

नमित पाटील,
पालघर, दि. 4/12/2019

   बोईसरमधील विविध भागातून दुचाकी चोरी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला असुन या चोरट्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामनंदन ऊर्फ बिल्ला गणेश पासवान (वय 19 वर्षे, रा.धोडीपूजा) असे सदर चोरट्याचे नाव आहे.

     स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव यांना एका दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान बिल्ला पासवान या दुचाकी चोराबाबत गुप्त माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व त्याची कसुन चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. 

 त्याच्याकडून बोईसर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केलेली 76 हजार रुपये किंमतीची युनिकॉर्न व 65 हजार रुपये किंमतीची होन्डा शाईन अशा दोन तर मनोर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केलेली 20 हजार रुपये किंमतीची अ‍ॅक्टीवा स्कुटी अशा तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी बिल्ला पासवान विरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सुरू आहे.

    दरम्यान, बिल्ला पासवान या अटक करण्यात आलेल्या चोरट्याविरोधात गुजरातमधील उमरगांव पोलीस स्टेशनमध्येही दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.