ETV Bharat / state

वसई-विरारमध्ये गुरुवारी 283 नवे रुग्ण; एकूण संख्या 10 हजार 606 वर

वसई-विरारमध्ये गुरूवारी 283 नवे रुग्ण आढळले आहेत. पालिका क्षेत्रातील एकुण संख्या 10 हजार 606 वर पोहोचली आहे. 6972 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Vasai Virar corona update
वसई विरार कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 24, 2020, 6:42 AM IST

वसई-विरार (पालघर)- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातही कोरोनाचा विळखा झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी वसई-विरारमध्ये तब्बल 283 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

गुरुवारी दिवसभरात उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 129 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवसात 283 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 10 हजार 606 वर पोहोचली आहे.

वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 219 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तर आतापर्यंत 6 हजार 972 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 हजार 415 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.