पालघर - चिल्हार महामार्गावरील नागझरी येथे दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून धडकेनंतर अज्ञात वाहन चालक फरारी आहे.
नितीन भोये (वय-22) आणि शैलेश भोये (वय-23) अशी अपघातात मृत पावलेल्या भावंडांची नावे आहेत. हे दोघेही बऱ्हाणपूरचे रहिवासी आहेत.
दोघेही बोईसर येथील ल्युपीन कंपनीतील कामगार असून पहाटे कंपनीत कामावर जात असताना हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.