पालघर- टेन पोलीस चौकीनजीक मनोर-वाडा मार्गावर ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. काशीनाथ मालकरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा- विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !
सकाळी कामावर जात असताना मनोर येथील टेन पोलीस चौकीजवळ काशीनाथ यांची दुचाकी भरधाव ट्रकवर जाऊन आदळली. यात ते ट्रकखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. काशिनाथ मालकरी हे वाडा तालुक्यातील इंदगावातील रहिवासी होते.