ETV Bharat / state

हुतात्मा स्तंभ येथे चलेजाव चळवळीतील हुतात्म्यांना पालघर वासियांनी केले वंदन

मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चळवळ उभारली. यात पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. आज पालघरात या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

author img

By

Published : Aug 14, 2019, 8:05 PM IST

हुतात्मा दिन साजरा

पालघर - 14 ऑगस्ट 1942 ला 'चलेजाव' चळवळीत पालघर तालुक्यातील पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. यानिमीत्ताने आज पालघर शहरातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येत एकत्र येपात या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच हुतात्म्यांना आदरांजली म्हणून पालघर शहरातील बाजारपेठेत उस्फुर्त बंद पाळण्यात आला.

मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी चळवळ उभारली. याच पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट 1942 ला पालघर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पालघर तालुक्यातील तारापूर, घिवली, वडराई, सातपाटी, शिरगाव, बोईसर, नवापूर, मनोरसह अनेक गावांमधील राष्ट्र सेवा दलाचे सदस्य, हजारो देशभक्त सहभागी झाले होते. स्वातंंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले स्वतंत्र सैनिक 'चले जाओ', 'अंग्रेजो भारत छोडो', 'करेंगे या मरेंगे' च्या घोषणा देत पालघर तहसीलच्या दिशेने कूच करू लागले. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने वातावरण तंग होते. दरम्यान, अहिंसेच्या मार्गाने सुरु असलेल्या या मोर्चावर इंग्रजांनी लाठीमार आणि गोळीबार सुरु केला.

या गोळीबारात पालघर तालुक्यातील नांदगाव येथील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील काशिनाथ हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्य सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी 14 ऑगस्टला पालघर येथील हुतात्मा चौकात 12 वाजून 39 मिनिटांनी शालेय विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि श्रद्धांजली अर्पण करतात.

याप्रसंगी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसह, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अग्निशनम दल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहली.

Intro:पालघरमध्ये हुतात्मा दिन साजरा; हुतात्मा स्तंभ येथे चलेजाव चळवळीत पाच हुतात्म्यांना पालघर वासियांनी केले वंदनBody: पालघरमध्ये हुतात्मा दिन साजरा; हुतात्मा स्तंभ येथे चलेजाव चळवळीत पाच हुतात्म्यांना पालघर वासियांनी केले वंदन

नमित पाटील,
पालघर, दि.14/8/2019

14 ऑगस्ट 1942 साली 'चाले जावं' स्वातंत्र्य संग्रामात पालघर तालुज्यातील पाच हुतात्म्यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. आज पालघर शहरातील विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत या हुतात्म्यांना वंदन करून श्रद्धांजली वाहण्यात आली. हुतात्म्यांना आदरांजली म्हणून पालघर शहरातील बाजारपेठेत उस्फुर्त बंद पाळण्यात आला.

मुंबई येथे 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले. याच पार्श्वभूमीवर 14 ऑगस्ट 1942 रोजी पालघर तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात पालघर तालुक्यातील तारापूर, घिवली, वडराई, सातपाटी, शिरगाव, बोईसर, नवापूर, मनोरसह अनेक गावांमधून राष्ट्र सेवा दलाचे सदस्य, हजारो देशभक्त सहभागी झाले होते. स्वातंंत्र्य मिळवून देण्याच्या उत्स्फूर्त प्रेरणेने भारावलेले स्वतंत्रसैनिक 'चाले जाओ', 'अंग्रेजो भारत छोडो', 'करेंगे या मरेंगे' घोषणा देत पालघर तहसीलच्या दिशेने हळूहळू कूच करू लागले. या आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असल्याने वातावरण तंग होते, अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेल्या या मोर्चावर इंग्रजांनी लाठीमार व गोळीबार सुरू केला.

या गोळीबारात पालघर तालुक्यातील नांदगाव येथील गोविंद गणेश ठाकूर, सातपाटी येथील येेेथील काशिनाथ हरी पागधरे, पालघर येथील रामप्रसाद भीमाशंकर तिवारी, मुरबे येथील रामचंद्र महादेव चुरी, सालवड येथील सुकुर गोविंंद मोरे या पाच स्वातंत्र्यसैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ पालघर शहरात हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील या हुतात्म्यांना वंदन म्हणून दरवर्षी 14 ऑगस्टला पालघर येथील हुतात्मा चौकात 12 वाजून 39 मिनिटांनी शालेय विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने एकत्र येत, श्रद्धांजली अर्पण करण्यात येते. याप्रसंगी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसह, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, आमदार, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पालघरच्या नगराध्यक्षा उज्वला काळे, पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अग्निशनम दल यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.