ETV Bharat / state

आदिवासी पाड्यावरील दिवाळी घडवतेय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

author img

By

Published : Nov 16, 2020, 9:10 PM IST

आदिवासी भागातील दिवाळी अजून काळाच्या ओघात टिकून आहे. तो सणाचा पारंपरिक ठेवा आजही ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवर दिसून येतो. या भागात जुन्या पद्धतीचे खाद्य पदार्थ बनविणे आणि ते विशिष्ट कालखंडात खाणे हेही त्यांनी जपले आहे.

tribal people diwali celebration palghar
आदिवासी पाड्यावरील दिवाळी घडवतेय ग्रामीण संस्कृतीचे दर्शन

पालघर - दिवाळी सण सर्वत्र हर्ष आणि उल्हासात साजरा केला जातो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच हा सण साजरा करण्यासाठी उत्साही असतात. लहान मुले नवीन कपडे, फटाक्यांची आतिषबाजी आणि किल्ले बनविण्यास रममाण असतात. तर मोठ्यांची तर या साऱ्या गोष्टींचा आनंद आपल्या परिवारास मिळावा यासाठी त्याची धडपड सुरू असते, अशी दीपावलीच्या सणाची सुरुवात मध्यम वर्गीय आणि शहरवासीयांची अशी पाहायला मिळत असते.

ग्रामीण संस्कृती आजही टिकून -

आदिवासी भागातील दिवाळी अजून काळाच्या ओघात टिकून आहे. तो सणाचा पारंपरिक ठेवा आजही ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवर दिसून येतो. या भागात जुन्या पद्धतीचे खाद्य पदार्थ बनविणे आणि ते विशिष्ट कालखंडात खाणे हेही त्यांनी जपले आहे. आधुनिक विचारांची देवाणघेवाण जरी आपल्यात करण्यात येत असली तरी अजून आपली पारंपरिक संस्कृतीचे दर्शन हे सणावारांत पदोपदी घडत असते. हे याचे उत्तम उदाहरण आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात आजही दिवाळी सण सन पारंपरिक वेशभूषेत, खाद्यान्न बनविणे आणि तारपानृत्याने होत असतो. खरेतर दिवाळी हा सण वसुबारस पासून सुरू होत असतो. या कालखंडात देवी देवतांचा जागर होत असतो.

हिरवा, कनसरी, धनतरी, गावतरी, चेडा, वीर, यांना नवस पुरवून सगळयांना सुखी ठेवण्याची प्रार्थना करतात. 'मानुसपुतळा, गाय-गोजी, चिडी-मुंगी, कोंबडी-बकरी, घरादाराला सुखी ठेवजोस', 'सगळ्यांना धान्याची बरकत मिळून दिजोस', अशा पारंपरिक बोलीभाषेत आर्त साद निसर्ग देवांना घालतात. यातुन सर्व प्राणीमात्रांना सुखी ठेवण्याची भावना ही आदिवासींत दिसून येते.

हेही वाचा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाकडून दिवाळी घरीच साजरी; कार्यकर्त्यांच्या भेटी रद्द

सूर तारपाचे कानी पडताच...

आदिवासी समाजाचे तारपा हे पारंपरिक वाद्य आहे. या वाद्याचे सूर कानी पडताच लहान मुलांपासून ते वयोवृध्द हे आनंदाने गोल फेरा धरून नाचत असतात.

पानांतली पानमोडी
केळी, कवदर, पळस, कुहरुळ इ. झाडांची पाने वारुण बनवलेल्या खाद्यपदार्थ बनविण्यासाठी वापर करतात. काकडी किसून त्यात गोड धोड टाकून पानात टाकून ती वाफ देऊन भाकरी बनवली जाते. तिला काही ठिकाणी पानमोडी म्हणतात. दिवाळी सणांत बाखरी, कांदफळे, चवळीच्या शेंगा खात असतात. चवळीच्या डाळीचे वरण-भात (जेवण), सोयीनुसार भाजी अशा प्रकारच्या खाद्यान्न बनविणे या सणात होत असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.