पालघर- राखी पौर्णिमा ( Rakhi Purnima of tribals women ) आली की महिला, मुली आपल्या भावासाठी वेगवेगळ्या आकाराच्या, डिझाईनच्या राख्या बनवितात. कोणी सोन्याच्या तर कोणी चांदीच्या राख्या विकत घेत असतात. गेल्या सात ते आठ वर्षांपासून सेवा विवेक या सामाजिक संस्थेच्या ( Seva Vivek initiative on Rakhi ) माध्यमातून आदिवासी महिला बांबूपासून राख्या तयार करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर्षी तर त्यांनी बांबूच्या राख्यांमध्ये विविध प्रकारच्या बिया टाकल्याने राख्यांमधून वृक्ष ( Tree seeds in Rakhi ) तयार करून ( Tree Created By Rakhi ) पर्यावरणाचे रक्षण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. त्यांच्या ह्या राख्यांना सध्या मागणीही मोठ्या प्रमाणात येत आहे.
50 हजारहून अधिक राख्यांची विक्री - राखी पौर्णिमा जवळ येऊ लागली की, आदिवासी महिलांची राख्या बनविण्याची लगबग सुरू होते. राखी पौर्णिमेसाठी जवळपास चार ते पाच महिने आधीपासून बांबू राखीची तयारी सुरू करावी लागते. यावर्षी बांबू राखी बनविण्यासाठी शेकडोहून अधिक आदिवासी महिला या ठिकाणी प्रशिक्षित आहेत. आदिवासी समाज हा वनांची पूजा करणारा समाज म्हणून ओळखला जातो. या समाजातील महिलांनी एकत्र येऊन सेवा विवेकच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून आत्तापर्यंत 50 हजारहून अधिक राख्यांची यशस्वीरीत्या विक्री झाली असून त्यांनी १ लाख राख्या विकण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
राख्यांमधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश- या राख्यांची वैशिष्ट्ये म्हणजे, बांबू राख्या ह्या पर्यावरण पूरक तसेच स्वदेशी आहेत. यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला यामध्ये लाकडी मणीचा वापर करण्यात आला आहे. सर्वांत महत्त्वाचे व यावर्षीचे नावीन्य म्हणजे या राख्या सोबत देशी वृक्षांचे बीज ही टाकले आहे. म्हणजेच एक राखी, एक वृक्ष ही संकल्पना राख्यांच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न कण्यात आला आहे. या राख्यांमध्ये वड, पिंपळ, शमी ,आवळा ,बेल, तुलसी, लिंबू ही देशी बियाणे टाकण्यात आल्याने सणा बरोबरच पर्यावरणाचे रक्षण असा संदेश या राख्यांमधून देण्याचे काम या आदिवासी महिलांनी केला आहे.
आदिवासी महिलांना सन्मानजनक रोजगार प्राप्ती - आदिवासी समाजातील महिलांना आत्मसन्मान आणि स्वावलंबी बनविण्याचे काम सुरू आहे. वने आणि जंगले सध्या नष्ट होत असताना आदिवासींचा रोजगारही हिरावला जात आहे. त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे काम आदिवासी महिला करत आहेत. या बांबूच्या राखीमधून सर्व आदिवासी महिलांना सन्मानजनक रोजगार प्राप्ती होत आहे व सर्व महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहेत.
आदिवासी महिला राष्ट्रपती पदी- आता तर देशाच्या राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातील असल्याने हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे व्यवस्थापक लुकेश बंड तसेच सेवा विवेक प्रगती भोईर, प्रशिक्षण व विकास अधिकारी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाला सर्वोच्च न्यायालयाची 'तारीख पे तारीख'