पालघर- वसईत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना आपल्या मायदेशी परतण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष ट्रेन सोडण्यात आली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही ट्रेन वसई रेल्वे स्थानकातून सोडण्यात आली असून त्यात १२०० मजूर प्रवास करीत आहेत. अडकडलेल्या कामगारांच्या समस्या ओळखून सरकारने ही व्यवस्था केली आहे.
कामगारांना त्यांच्या घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत बसने आणण्यात आले होते. त्यांना जेवणाची पाकिटे, मास्क, सॅनिटायझर व पाणी देण्यात आले होते. त्याचबरोबर, रेल्वे स्थानकावर गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने एका बोगीत प्रत्येकी ४८ कामगार बसण्याची व्यवस्था ट्रेनमध्ये करण्यात आली होती. दरम्यान, या पुढे ऑनलाइन पद्धतीने मजुरांच्या ट्रेनची बुकिंग केली जाणार असून मजुरांची चाचणी करूनच त्यांना सोडणार असल्याची माहिती, वसईचे प्रांत अधिकारी राहुल क्षीरसागर यांनी दिली आहे.
हेही वाचा- प्राथमिक आरोग्य केंद्रांना पीपीई कीटचे वाटप; राजेंद्र पाटलांचा पुढाकार