पालघर - कोरोनाचा विळखा राज्यात वाढतच चालला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असून ३ वर्षीय चिमुकलीला कोरोनाची लागण झाली आहे.
ही मुलगी एका वीटभट्टी कामगाराची असून तीला सर्दी, ताप व खोकला झाल्यामुळे ९ एप्रिल रोजी डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी तीच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले. हा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे डहाणू परिसरात खळबळ उडाली असून लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, मुलीची प्रकृती स्थीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वाणेरे यांनी दिली आहे.
हेही वाचा - मिरा भाईंदरमध्ये ४३ जण कोरोनाबाधित, ४९ जणांचे अहवाल प्रलंबित