पालघर - बोईसर येथे कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले असून हे तीनही रुग्ण दलाल टॉवर येथील रुग्णाचे नातेवाईक आहेत. नव्याने आढळलेल्या या कोरोना रुग्णांमध्ये 12 व 3 वर्षाच्या दोन मुलांचा तसेच एका 30 वर्षीय महिलेचा समावेश आहे. बोईसर येथे काल आढळलेल्या पहिल्या रुग्णाला ठाणे येथे हलवण्यात आले असून उर्वरित तीन रुग्णांना बोईसर येथील टिमा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोरोनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून पुढील ५ दिवस बोईसर शहर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रुग्ण राहत असलेल्या दलाल टॉवरच्या आसपासचा ५०० मीटरचा परिसर पोलीस प्रशासनामार्फत सील करण्यात आला आहे. येथील सर्व नागरिकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.