ETV Bharat / state

वसई विरारमध्ये रविवारी आढळले 360 नवे कोरोना रुग्ण; 202 जणांची कोरोनावर मात - Vasai Virar corona update

360 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 965 वर पोहोचली आहे. रविवारी 202 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

vasai virar corona update
वसई विरार कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 13, 2020, 7:36 AM IST

वसई-विरार (पालघर) - वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येते. दिवसाला सरासरी 150 ते 200 नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. मात्र, रविवारी वसई -विरारमध्ये एका दिवसात 360 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

रविवारी दिवसभरात उपचारादरम्यान 03 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 202 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

360 रुग्ण वाढल्यामुळे वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 हजार 965 वर पोहोचली आहे. वसई विरारमध्ये आतापर्यंत एकूण 158 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

पालिका क्षेत्रात आतापर्यंत 5 हजार 654 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 हजार 153 कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.