ETV Bharat / state

Palghar Accident News: मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोटरसायकलचा भीषण अपघात; तीन जणांचा जागीच मृत्यू - कंटेनरची दुचाकीस्वारास धडक

मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे एशियन पेट्रोलपंपाजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान मृत व्यक्ती तलासरी तालूक्यातील असल्याची माहिती मिळत आहे.

Palghar Accident News
मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोटरसायकलचा भीषण अपघात
author img

By

Published : Feb 14, 2023, 1:14 PM IST

Updated : Feb 14, 2023, 1:49 PM IST

मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

पालघर : मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे एशियन पेट्रोलपंपाजवळ मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरने दुचाकीस्वारास धडक दिल्याने सदर अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान सदर मृत व्यक्ती तलासरी तालूक्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात : पुणे-नाशिक महामार्गावर असणाऱ्या खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ 13 फेब्रुवारीला रात्री भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडून येणाऱ्या चारचाकी वाहनाने महिलांच्या घोळक्याला उडवले. या अपघातात पाच महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. 5 पेक्षा अधिक महिला जखमी झाल्या. सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय ४६) अशी मृत महिलांची नावे आहे. अन्य मृत महिलांची नावे समजू शकली नाहीत. अन्य जखमी महिलांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होता.

ट्रेनने कर्मचाऱ्यांना उडविले : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान लाईट दुरुस्त करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी इंजिन चुकीच्या दिशेने आल्याने काम करत असलेल्या चार गँगमनला उडवल्याची घटना 13 फेब्रुवारीला सकाळी घडली. या घटनेत चारही गँगमचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, लासलगाव रेल्वे स्थानकावर पहाटे 5.44 वा दरम्यान टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते.

मेरठमधील अपघात : मेरठच्या परतापूर पोलीस स्टेशन हद्दीत 12 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा एका मद्यधुंद ट्रक चालकाने कारला फिल्मी स्टाईलने धडक दिली होती. धडकेनंतर त्याने कार जवळपास तीन किलोमीटरपर्यंत फरपटत नेले होते. कारमधील चार तरुणांनी कसेबसे कारमधून उडी मारून आपला जीव वाचवला होता. कारमधील तरुणांनी परतापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे मेरठमध्ये गेल्या अनेक दिवसांत अशा दुर्घटना घडल्या होत्या.

ट्रक व मेटाडोर समोरासमोर भिषण धडक : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर तालसवाडा नजीक पुलावर ट्रक व मेटाडोर समोरासमोर भिषण धडक झाली होती. ही धडक एवढी भिषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील 3 जण जागीच ठार झाले होते. तर 1 जण गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर बुलढाणा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. यातील जखमींना तत्काळ मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा : Pune Accident News: पुणे-नाशिक महामार्गावर चारचाकी वाहनाने महिलांच्या घोळक्याला उडवले; पाच महिलांचा जागीच मृत्यू, 5 पेक्षा अधिक जखमी

Last Updated : Feb 14, 2023, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.