पालघर - शहरातील माहीम रोड येथील दोन दुकानांत चोरीची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी दुकानांचे शटर उचकटून एक लॅपटॉप, रोख रक्कम व दुकानातील समान लंपास केले आहे. गेल्या काही दिवसात पालघर शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा... आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन, भाजपला शिवसेनेसह इतर विरोधकांचा करावा लागणार 'सामना'
पालघर शहरातील माहिम रोड येथील भवानी मेडिकल आणि न्यू खुशबू मोबाईल या दोन दुकानांमध्ये रविवारी रात्री चोरीची घटना घडली. चोरट्यांनी रात्री या दोन दुकानांचे शटर उचकटून एक लॅपटॉप, दुकानातील समानासहित हजारो रुपयाची रोकड रक्कम लंपास केली. गेल्या काही दिवसात पालघर शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या वाढत्या घटनांकडे पाहता चोरांना पोलिसांचे भय राहिले नाही का? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.
हेही वाचा... काँग्रेससोबत चर्चा करुन लवकरच पर्यायी सरकार स्थापन करणार - नवाब मलिक