ETV Bharat / state

चोरट्याने मारला दुकानावर डल्ला, मोबाईल विसरल्याने सापडला पोलिसांच्या कचाट्यात

एका मोबाईल दुकानात गल्ल्यातील पैसे चोरून पसार झालेल्या चोरट्याला माणिकपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. मुख्य म्हणजे, चोरटा फोन दुकानातच विसरून गेल्याने त्याच्या आधारावर त्याला तत्काळ पकडण्यात यश आले.

theft cought in just four hours at palghar
मोबाईल दुकानातील गल्ल्यावरील पैशावर डल्ला मारणारा अवघ्या चार तासात जेरबंद...
author img

By

Published : Dec 5, 2019, 8:41 PM IST

पालघर - एका मोबाईल दुकानात गल्ल्यातील पैसे चोरून पसार झालेल्या चोरट्याला माणिकपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले. मुख्य म्हणजे, चोरटा फोन दुकानातच विसरून गेल्याने त्याच्या आधारावर त्याला तत्काळ पकडण्यात यश आले.

मोबाईल दुकानातील गल्ल्यावरील पैशावर डल्ला मारणारा अवघ्या चार तासात जेरबंद...

वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानी मोबाईल अॅण्ड ट्रॅव्हल्स या दुकानात सोमवारी रात्री आठ वाजता एक चोरटा ग्राहक बनून आला. त्याने फोन विकत घेण्याच्या बहाण्याने दुकान मालकाला गुंतवून गल्ल्यातील 28 हजार रुपये चोरले. मात्र ही बाब दुकानमालकाच्या लक्षात येताच त्याने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकान मालकालासोबत झालेल्या झटापटीत चोरटा त्याचा फोन दुकानातच विसरून गेला. ही सपुर्णं घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

हेही वाचा - वृद्ध दाम्पत्याचे एक लाख रुपये चोरणाऱ्या ओडिशातील दोघांना अटक

याप्रकरणी दुकानमालकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मोबाईलवरील काॅल रेकाॅर्डच्या आधारावर त्याच्या तीन मित्रांना नालासोपाऱ्यातून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर आकाशचंद्र प्रकाश चौबे नामक मित्राचा तो फोन असल्याचे त्यांनी सांगीतले. दरम्यना, पोलिसांनी लगेच आकाशचंद्र चौबेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 18 हजार रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असुन उर्वरीत 10 हजार रूपये त्याने खर्च केले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वसई सत्र न्यायालयात आरोपीला मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहे.

Intro:वसईत मोबाईलच्या दुकानात चोरी करणारा चोरटा अवघ्या चार तासात जेरबंद...
Body:वसईत मोबाईलच्या दुकानात चोरी करणारा चोरटा अवघ्या चार तासात जेरबंद...

फोन विसरून गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडला...

पालघर /वसई : वसईतील एका मोबाईलच्या दुकानात गल्ल्यातील पैसे चोरून पसार झालेल्या चोरट्याला माणिकपूर पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केले आहे.चोरट्याने गल्ल्यातील पैसे चोरले मात्र दुकानमालकासोबत झालेल्या झटापटीत तो त्याचा फोन तेथेच विसरून पळाला होता.चोरट्याने गल्ल्यातील 28 हजाराची रोख रक्कम लांबवली होती.हि घटना सिसिटीव्ही कॅमे-यात कैद झाली होती.माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत भवानी मोबाईल अॅण्ड टॅव्हल्स या दुकानात सोमवारी रात्री आठ वाजता एक चोरटा ग्राहक बनून आला.सामान घेण्याच्या बहाण्याने त्याने मालकाला गुंतवून गल्लातील पैसे काढले.पैसे काढल्याचे लक्षात येताच मालकाची चोरट्यासोबत झटापटही झाली.यादरम्यान चोरट्याने दुकानमालकाच्या हाताला झटका देऊन दुकानाबाहेर पळ काढून पोबारा केला.मात्र या गडबडीत त्याचा मोबाईल दुकानात राहिला होता. दुकानमालकाला लक्षात आल्यावर पोलिसात त्यानी तक्रार दाखल केली. दुकानदाराच्या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मोबाईलवरील काॅलरेकाॅर्डच्या आधारावर चोरट्याच्या तीन मित्रांना नालासोपारा पूर्व येथे पुढील तासाभरात सापळा रचून ताब्यात घेतले. मित्रांकडे चौकशी केल्यानंतर आकाशचंद्र प्रकाश चौबे या कांदिवलीत राहणा-या मित्राचा तो फोन असल्याचे त्यांनी सांगीतल्यावर पोलिसांनी आकाशचंद्र चौबे याला ताब्यात घेतले.त्याच्याकडून 18 हजार रूपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.तसेच उर्वरीत 10 हजार रूपये त्याने खर्च केले असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी वसई सत्र न्यायालयात आरोपीला मंगळवारी हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कस्टडी देण्याचे आदेश दिले.पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

बाईट : राजेंद्र कांबळे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिकपूर पोलिस ठाणेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.