ETV Bharat / state

नियोजन शून्य शासकीय यंत्रणेच्या चुकांची शिक्षा वसईकरांना भोगावी लागतीय - विवेक पंडित

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पूर येत आहे. त्यावर उपायोजना करण्याऐवजी वसईतील शासनकर्ते व अधिकारी 'नैसर्गिक आपत्ती'च्या नावाखाली आपली चूक निसर्गावर ढकलत आहेत, असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले. आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी पूरग्रस्त भागातील प्रतिनिधींच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या.

नियोजन शून्य व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेच्या चुकांची शिक्षा वसईतील सामान्य नागरिकांना; विवेक पंडित
author img

By

Published : Aug 16, 2019, 9:31 PM IST

पालघर - नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पूर येत आहे. त्यावर उपायोजना करण्याऐवजी वसईतील शासनकर्ते व अधिकारी 'नैसर्गिक आपत्ती'च्या नावाखाली आपली चूक निसर्गावर ढकलत आहेत, असे मत विवेक पंडित यांनी व्यक्त केले आहे.

नियोजन शून्य व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रणेच्या चुकांची शिक्षा वसईतील सामान्य नागरिकांना; विवेक पंडित
आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आज(शुक्रवार) तहसीलदार कार्यालयात पूरपरिस्थिती, पंचनामे, मदतकार्य व उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी वसईचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, महानगर पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, बीडीओ उपस्थित होते. नियोजन शून्य व्यवस्थापन आणि शासकीय यंत्रनेच्या चुकांची शिक्षा वसईतील सामान्य नागरिक भोगत आहे. वसईतील अनधिकृत बांधकामे, पाणथळ जागा, तलाव, बावखल हे सुशोभीकरणाच्या नावाखाली बुजवले जात आहेत. यामुळेच वसई बुडत असल्याचा आरोप पंडित यांनी केला.
वसईतील पूर हा पूर्णतः मानवनिर्मित आहे. राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अधिकारी, ठेकेदार यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश पंडित यांनी दिले. यावेळी वसईतील पूरग्रस्त भागातील प्रतिनिधींच्या भेटी घेवून समस्या जाणून घेतल्या. पंडित यांच्या दौऱ्यामुळे वसईतील सामान्य जनता समाधानी असून शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आहे.

Intro:स्वतःच्या यंत्रणेच्या चुका निसर्गावर लादू नका - विवेक पंडित.
  Body:व्हिडीओ पाठवले आहे.

स्वतःच्या यंत्रणेच्या चुका निसर्गावर लादू नका - विवेक पंडित.
  
नालासोपारा : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने वसई तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले अनेक लोकांची घरे दुकाने पाण्याखाली गेली जनतेचे अतोनात नुकसान झाले. घरात घुसलेले पाणी, पुरा सोबत आलेली घाण यामुळे वसईतील जनता त्रस्त झाली. गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पूर येत आहे.त्यावर उपायोजना करण्याऐवजी वसईतील शासनकर्ते व अधिकारी "नैसर्गिक आपत्ती" असे म्हणून आपली चूक न सुधारता  निसर्गावर ढकलत असल्याचे पंडित यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.
आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या अध्यक्षतेखाली आज तहसीलदार कार्यालयात पूर परिस्थिती, पंचनामे,मदतकार्य व उपाययोजनाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी वसईचे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, मंडळ अधिकारी, महानगर पालिका अधिकारी, पोलिस अधिकारी, बी डी.ओ.आदी अधिकारी उपस्थित होते. वसईतील अनधिकृत बांधकामे, नैसर्गिक नाले बुजवून त्यावरील बांधकामे, पाणथळ जागा, खाजण जमिनीतील कोलंबी प्रकल्प व भराव. तलाव, बावखल हे सुशोभीकरण नावाखाली बुजविने व घनता कमी करणे आदी कारणाने वसई बुडत असल्याचा आरोप पंडित यांनी केला आहे. वसईतील पूर हा पूर्णतः मानवनिर्मित आहे. नियोजन शून्य व व्यवस्थापन कमतरता अश्या शासकीय यंत्रनेच्या चुकांची शिक्षा  वसईतील सामान्य नागरिकाला भोगावे लागते. त्यामुळे निसर्गावर जबाबदारी न ढकलता, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार या परिस्थितीस जबाबदार असलेल्या अधिकारी,ठेकेदार, बिल्डर यांच्यावर तत्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करावी असे आदेश पंडित यांनी दिले. यावेळी वसईतील पूरग्रस्त भागातील शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी , आदिवासी व सर्वसामान्य जनतेशी पंडित यांनी शासकीय अधिकारी सोबत गिरीज, निर्मळ,वाघोली,आगाशी, अर्नाळा, चुळने, नवघर व पूर्व पट्टी आदी ठिकाणी प्रातिनिधिक भेट घेवून त्यांचे समस्या जाणून घेतल्या. कागदी घोडे नाचवून प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असल्याचे यावेळी दिसून आले. मा. विवेक पंडित यांनी यावर नाराजगी व्यक्त करून शासकीय यंत्रनेला तत्काळ शेतकरी,पूरग्रस्त भागातील नागरिक त्यांचा पंचनामा करून पुढील सात दिवसात तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. पंडित यांच्या दौऱ्यामुळे वसईतील सामान्य जनता एकीकडे खुश असून शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली असून शासकीय यंत्रणा जोरात कामाला लागल्याचे दिसून येते.    Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.