ETV Bharat / state

Torrential Rains : मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी डोली यात्राच, मुसळधार पावसात 4 किलोमीटर पायपीट - Beautiful Jayaram Kirkire

मोखाड्यातील आदिवासीं प्राथमिक सुविधां अभावी आजही पारतंत्र्यातच जीवन जगत आहेत. तालुक्यातील बोटोशी गावठाणात जायला रस्ता नसल्याने कित्येक तास सीता दिवे या गर्भवती महिलेने प्रसुती ( Pregnant women ) वेदना सहन केल्या. त्यानंतर सुंदर जयराम किरकिरे (35) ( Beautiful Jayaram Kirkire ) या आदिवासी महिलेला ( tribal woman ) मंगळवारी 5 जुलै रोजी रात्री जुलाबचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बुधवारी गावकऱ्यांनी तीला मुसळधार पावसात ( Torrential Rains ) प्लास्टिकच्या कापडात गुंडाळुन 4 किलोमीटर पायपीट करत बेलपाडा येथे मुख्य रस्त्यापर्यंत आणले.

Torrential Rains: 4 km pipeline in torrential rains
Torrential Rains : मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी डोली यात्राच, मुसळधार पावसात 4 किलोमीटर पायपीट
author img

By

Published : Jul 7, 2022, 4:54 PM IST

पालघर- मोखाड्यातील बोटोशी गावठाणात रस्ता नसल्याने, गर्भवती महिलेला प्रसुती वेदना सहन कराव्या लागल्या. ही घटना ताजी असतांना बोटोशी मरकटवाडी येथील सुंदर जयराम किरकिरे (35) या आदिवासी महिलेला ( tribal woman ) जुलाबचा त्रास होऊ लागल्याने तीची तब्ब्येत अधीक खालावली. गावात यायला रस्ता नाही, केवळ पायवाटच आहे. त्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी मुसळधार पावसात ( Torrential Rains ) सुंदरला डोली करून 4 किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. तेथून तीला खाजगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. स्वातंत्र्याची 75 वर्षं ऊलटूनही मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी आजही डोली यात्रा मरणं यातनाच दिसत आहेत.

Torrential Rains : मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबी डोली यात्राच, मुसळधार पावसात 4 किलोमीटर पायपीट

आदिवासी आजही पारतंत्र्यातच - स्वातंत्र्याचे 75 वर्षानिमित्त, हिरक महोत्सव संपुर्ण देशात साजरा केला जात आहे. मात्र, मोखाड्यातील आदिवासीं प्राथमिक सुविधां अभावी आजही पारतंत्र्यातच जीवन जगत आहेत. तालुक्यातील बोटोशी गावठाणात जायला रस्ता नसल्याने कित्येक तास सीता दिवे या गर्भवती महिलेने प्रसुती वेदना सहन केल्या. येथे ग्रामस्थांनी श्रमदानाने रस्ता केला. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखून तीला दवाखान्यात दाखल केले. या घटनेचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. मात्र, रस्त्यांचा, प्राथमिक सुविधांचा मुळप्रश्न तसाच दुर्लक्षित राहीला आहे. तालुक्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायती मधील मरकटवाडी येथे ही जायला रस्ता नाही. केवळ 4 किलोमीटर ची पायवाट आहे. 50 घरे तसेच 250 आदिवासी लोकवस्तीची वाडी.

4 किलोमीटर पायपीट - ही वाडी स्वातंत्र्यपुर्व काळापासून वसलेली आहे. येथे अंगणवाडी, प्राथमिक शाळा आहे. या वाडीत अंगणवाडी सेविका मदतनीस सुंदर जयराम किरकिरे (35) या आदिवासी महिलेला मंगळवारी 5 जुलैला रात्री जुलाबचा त्रास होऊ लागला. तेथे काहीच सुविधा नसल्याने हा त्रास अधिकच बळावला. अखेर बुधवारी 6 जुलैला सकाळी 7 : 30 च्या दरम्यान येथील गोविंद वाघ, जयराम किरकिरे, हनुमंत वाघ, विलास वाघ त्यांच्या सहकार्यांनी मुसळधार पावसात सुंदरला प्लास्टिकच्या कापडात गुंडाळुन 4 किलोमीटर पायपीट करत बेलपाडा येथे मुख्य रस्त्यापर्यंत आणले.

स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही सुविधांचा अभाव - येथील आशा कार्यकर्ती मंदा वाघ यांनी पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांना फोनकरून ही घटना सांगितली. पवार यांनी तातडीने येथे त्यांना खाजगी जीप ऊपलब्ध करून दिली. तेथून सुंदरला तातडीने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात ऊपचारासाठी दाखल केले आहे. तीची तब्ब्येत ठिक असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तालुक्यात अनेक गाव, खेडे पाड्यांना अजुनही प्राथमिक सुविधा पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही येथील आदिवासी मरण यातना भोगत असल्याचे या घटनांमुळे समोर आले आहे.

अनेकदा पाठपुरावा करूनही रस्ता नाही - मरकटवाडी येथे जाण्यासाठी रस्ता तयार करावा यासाठी माजी सरपंच जिजाबाई पवार, उपसरपंच त्र्यंबक मालक यांनी अनेकदा कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील या विषयी पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, अजूनही प्रशासकीय यंत्रणा हललेली नाही. तसेच लोकप्रतिनिधीनी ही याबाबीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येथील आदिवासींना हाल अपेष्टा भोगाव्या लागत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यांच्यावर एम्समध्ये उपचार; प्रकृतीवर डॉक्टरांचे बारीक लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.