ETV Bharat / state

पालघरच्या दुर्गम भागात मान्सूनपूर्व आठवडी बाजार फुलले; सुक्या मासळीची मागणी वाढली

रामीण भागातल्या आठवडी बाजारात सध्या वाड्या-पाड्यावरील आदीवासी नागरिकांची मासळी खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. परिणामी मासळी विक्रेत्यांचा धंदाही तेजीत आहे. जव्हार, मोखाडा, तलवाडामधील मच्छीमार समाजाबरोबर सातपाटी, डहाणू, वसई, केळवे भागातील मासळी विक्रेत्या महिला विविध ठिकाणच्या आठवडी बाजारात आपले दुकान थाटतात.बोंबील, सुकट, कोलीम मांदेली, बागडे, जवळा, करंदी अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीचा यात समावेश असतो.

author img

By

Published : Jun 3, 2019, 5:29 PM IST

दुर्गम भागात मान्सूनपूर्व खरेदीसाठी लगबग

पालघर - पावसाळा तोंडावर आल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुक्या मासळीच्या खरेदीला प्राध्यान दिले जाते. ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात सध्या वाड्या-पाड्यावरील आदीवासी नागरिकांची मासळी खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. परिणामी मासळी विक्रेत्यांचा धंदाही तेजीत आहे.

दुर्गम भागात मान्सूनपूर्व खरेदीसाठी लगबग

जव्हार, मोखाडा, तलवाडामधील मच्छीमार समाजाबरोबर सातपाटी, डहाणू, वसई, केळवे भागातील मासळी विक्रेत्या महिला विविध ठिकाणच्या आठवडी बाजारात आपले दुकान थाटतात.

सुकी मासळी ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला की मासेमारी व्यवसाय बंद होतो. ताजी मासळी बाजारात उपलब्ध होत नाही. यावेळी सगळ्या खवय्यांचा भर सुक्या मासळीवर असतो, त्यामुळे सुकी मासळीची साठवण ग्रामस्थ करततात. बोंबील, सुकट, कोलीम मांदेली, बागडे, जवळा, करंदी अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीचा यात समावेश असतो.

दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मासळीचे भाव वाढले आहेत. पूर्वी शंभर रुपये दराने मिळणारे सुके बोंबील आता दोनशे ते अडीशे रुपयांनी शेकडा विकले जाते. एकंदरीत सुकी मासळी ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दर वाढले असले तरी सुक्या मासळीची खरेदी कमी झालेली दिसत नाही.

Intro:दुर्गम भागात मान्सूनपूर्व खरेदीसाठी लगबग: आठवडी बाजारात सुक्या मासळीची वाढती मागणीBody: दुर्गम भागात मान्सूनपूर्व खरेदीसाठी लगबग: आठवडी बाजारात सुक्या मासळीची वाढती मागणी

नमित पाटील,
पालघर, दि.3/6/2019

पावसाळ्यापूर्वी गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी तालुक्यातील विविध आठवडी बाजारात लोकांची लगबग सुरू आहे. महागाई वाढली असली तरी मोठ्या प्रमाणात सुक्या मासळीची खरेदी केली जात असल्याचे दिसते. पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने मान्सूनपूर्व खरेदीकडे ग्रामीण भागातिल नागरिक जीवनावश्यक वस्तूबरोबरीने सुक्या मासोळीची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याने मासळी विक्रेत्यांचा धंदा तेजीत आहे.

जव्हार, मोखाडा, तलवाडामधील मच्छीमार समाजाबरोबर सातपाटी, डहाणू, वसई, केळवे भागातील मासळी विक्रेत्या महिला विविध ठिकाणच्या आठवडी बाजारात आपले दुकान थाटतात. मासळी खरेदी साठी ग्रामीण भागातील आदिवासी ग्राहकांची चार महिन्याच्या खरेदीसाठी झुंबड असते पावसाळा जवळ आल्यावर समुद्रातील मासेमारी बंद होत असल्याने ताजी मासळी बाजारात उपलब्ध होत नाही यावेळी सगळ्या खवय्यांचा भर सुक्या मासळीवर असतो त्यामुळे सुकी मासळीची साठवण ग्रामस्थ करततात. बोंबील, सुकट, कोलीम मांदेली, बागडे, जवळा, करंदी अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीचा यात समावेश असतो.

उन्हाळ्यात विकली जाणारी ताजी मासळी मिठ लावून सुकतात व सुकल्यावर विकण्यासाठी पालघर बोईसर, डहाणू, विक्रमगड, तलवाडा, वसुरी, आपटी मलवाडा आधी मोठ्या गावाच्या बाजारात विकली जाते. गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलेला महागाईचा फटका सुक्या मासळीला बसला आहे. पूर्वी शंभर रुपये दराने मिळणारे सुके बोंबील आता दोनशे ते अडीशे रुपयांनी शेकडा विकले जातो.

गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी भाव वाढले असले तरी पावसाळ्यात ओली मच्छी मिळत नसल्याने पर्यायी सुक्या मच्छी वर अवलंबून राहावे लागते. सुकी मासळी येथिल ग्रामीण भागातील नागरिकांना गरजेचे आहे दिवसभर पावसात भिजून आल्यावर त्याच्या बांगडा बोंबील अथवा अन्य सुखी मच्छी जेवताना भाजून दिल्यास जेवणार्याच्या चेहर्‍यावर समाधान दिसते शिवाय कांद्यावर तळलेला सुकट, कोलिम सह शेताच्या बांधावर बसून केलेल्या न्याहरीची चव काही औरच....

एकंदरीत सुकी मासळी ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे दर वाढले असले तरी इतर बाजारच्या सुकी मासळी चवदार असल्याने सुक्या मासळीची खरेदी कमी झालेली दिसत नाही.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.