पालघर: जिल्ह्याला 125 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला तसेच अनेक जैव विविधता लाभली आहे. विपुल प्रमाणात मिळणाऱ्या माशां बरोबरच समुद्रातून मिळणारे कला कौशल्याने भरलेले शंख शिंपले विविध आकाराचे दगडही आता रोजगाराचे चांगले साधन ठरत आहेत. या समुद्रातून मिळणाऱ्या संपत्तीतून आपला उदरनिर्वाह करणारे अनेक लोक पहायला मिळत आहेत समुद्रकिनाऱ्यावर विविध आकाराचे शंख शिंपले कवड्या तसेच औषधी वनस्पती गोळा करून अर्थाजन केले जाते.
महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागरी किनारा मिळाला आहे या मध्ये अनेक कांदळवणे आहेत समुद्रातुमन भरपूर प्रमाणात मिळणारे मासे तर आहेतच पण या सागरी पाण्यात उगवणाऱ्या एक पेशी वनस्पती देखीलअन्न म्हणून उपयोगात आणता येतात. समुद्रातील अनेक वनस्पतींचा कर्करागाचे औषध म्हणून देखील उपयोग केला जातो. सोबतच सागरी किनाऱ्यावर मिळणाऱ्या अनेक जैविक पदार्थाचे विविध उपयोगही पहायला मिळत आहेत.
समुद्र आणि किनारपट्टी हा निसर्गाने आपल्याला दिलेला जैविक विविध खजिना आहे. धनसंपदे बरोबरच मानवाच्या प्रगतीसाठी याचा उपयोग केला तर त्याचा नक्कीच फायदा आहे. समुद्रकिनारालगत मिळणाऱ्या शंख शिंपले कवड्या विविध दगड यावर थोडीशी स्वच्छता व कारागिरी करून ऍक्रेलिक रंगाने सजवुन कलाकार मंडळी आर्थिक उन्नती करत आहेत. अनेक वस्थाना जवळ या कलाकृतीच्या वस्तू भाविक श्रद्धेने विकत घेत आहेत. समुद्रातील संपत्ती हौशी नागरिक विविध तू खरेदी करून आपल्या घरी शोपीस म्हणून बाळगत आहेत.
सागराच्या किणाऱ्यावर सापडणाऱ्या या वस्तुंवर केलेली कलाकुसर पसंतीस उतरत आहे. पण यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला तर किनाऱ्यावरील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते असे सांगितले जात आहे. समुद्रकिनारा जवळ अशा अनेक वस्तू सहज मिळतात. त्यावर मेहनत घेऊन ती मोठया बाजारपेठेत चांगल्या किंमतीला विकू शकतो. अनेक हौशी कलावंत हे काम करीत आहेत.
समुद्रकिनाऱ्याजवळ सापडणारे शंख शिंपले कवड्या विविध रंगाचे दगड गोळा करून त्यावर काही कलाकुसर करून ती विकली जाते. या वस्तू गोळा करून आणणारे नागरिक अगदी पाच ते दहा रुपयात या वस्तू विकतात. आम्ही त्यावर कलाकुसर करून तीच वस्तू शंभर ते दीडशे रुपयांना विकतो. याची विविध राज्यात खूप मागणी आहे. या कलाकुसरीला तसेच शंख शिंपले व अशा वस्तु गोळा करणाऱ्या स्थानिकांना चांगली बाजारपेठ उपलब्द झाली तर त्याचा मोठा फायदा होईल असे मत डहाणू येथिल कला शिक्षक हितेंद्र गवादे यांनी व्यक्त केले आहे.